For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

फ्रेडरिक मर्झ यांचा जर्मनीत ऐतिहासिक विजय

01:44 PM Feb 24, 2025 IST | Pooja Marathe
फ्रेडरिक मर्झ यांचा जर्मनीत ऐतिहासिक विजय
Advertisement

अमेरिकेवर साधला निशाणा
बर्लिन (जर्मनी)
२०२५ च्या जर्मन राष्ट्रीय निवडणुकीत फ्रेडरिक मर्झ यांच्या नेतृत्वाखालील पुराण मतवादी युती ने विजय मिळवला आहे. या विजयाने जर्मनीच्या राजकिय इतिहासात एक मोठा टप्पा गाठला आहे. या निवडणुकीने देशाच्या राजकिय समीकरणांमध्ये मोठा बदल घडवला असून, अतिउजव्या पक्ष अल्टरनेटीव्ह फॉर जर्मनी ने विक्रमी पाठींबा मिळवत दुसरे स्थान मिळवले आहे.
मर्झ यांचा विजय आणि अमेरिकेवर टीका
CDU/CSU च्या विजयासह फ्रेडरिक मर्झ हे जर्मनीचे नवीन चान्सलर बनणार आहेत. मात्र, आपल्या विजयाच्या भाषणात त्यांनी अमेरिकवर थेट निशाणा साधत युरोपच्या स्वायत्ततेवर भर दिला. त्यांनी स्पष्ट केले की, युरोपमधील एकता वाढवणे आणि अमेरिकीच्या प्रभावातून वास्तविक स्वातंत्र्य मिळवणे हे त्यांचे प्राथमिक उद्दीष्ट असेल. अमेरिकेच्या बदलत्या धोरणांमुळे युरोपला आता स्वतःच्या भविष्यासाठी स्वतःवर अवलंबून राहावे लागेल, असे मर्झ यांनी या भाषणात म्हणाले.
जर्मनीच्या या निवडणुकीत अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि टेक उद्योजक एलोन मस्क यांनी एएफडी (AFD) ला जाहीर पाठींबा दिला. ट्रम्प यांनी ओलाफ स्कोल्झ यांच्या सरकरच्या धोरणांवर टीका करत जर्मनीच्या जनतेने अक्कल नसलेली धोरणे नाकरली असल्याचे म्हटले. त्यांच्या ट्रुथ सोशल अकाऊंटवर त्यांनी पोस्ट करत म्हटले की, जर्मनीसाठी एक चांगला दिवस आहे. जर्मन जनता आता कोणत्याही अजेंड्याला कंटाळली आहे.
AFD ची वाढता प्रभाव आणि युतीचे आव्हान
या निवडणुकीत AFD ने २०.५ % मते मिळवून ऐतिहासिक यश मिळवले आहे, जे मागील निवडणुकीपेक्षा दुप्पट आहे. मात्र, CDU/ CSU सह मुख्य प्रवाहातील कोणत्याही पक्षाने AFD सोबत युती करण्यास नकार दिला आहे. त्यामुळे फ्रेडिरक मर्झ यांना सरकार स्थापन करण्यासाठी लहान पक्षांसोबत युती करण्यासाठी वाटाघाटी कराव्या लागतील.

Advertisement

Advertisement
Tags :

.