For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

समुद्राच्या खाली गोड्या पाण्याचा साठा

06:42 AM Sep 16, 2025 IST | Tarun Bharat Portal
समुद्राच्या खाली गोड्या पाण्याचा साठा
Advertisement

समुद्राच्या खाली पिण्याचे पाणी लपलेले असू शकते. अमेरिकेच्या केप कॉडनजीक वैज्ञानिकांनी एक असा शोध लावला आहे, जो जगातील पाण्याची कमतरता दूर करू शकतो. एक्सपेडिशन 501 नावाच्या या मिशनने समुद्रतळाखाली गोड्या पाण्याच्या विशाल भांडाराचा शोध लावला असून तो न्यूजर्सीपासून मेनपर्यंत फैलावलेला असू शकतो. जवळपास 50 वर्षांपूर्वी अमेरिकन सरकारचे एक जहाज खनिज आणि कच्च्या तेलाच्या शोधात समुद्रतळावर ड्रिलिंग करत होते, त्याला कच्चे तेल नव्हे परंतु गोड्या पाण्याचा साठा मिळाला आहे.

Advertisement

यावेळी 2025 मध्ये एक्सपेडिशन 501 ने या रहस्याला आणखी खोलवर जात शोधून काढले आहे. हा 2100 कोटी रुपयांचा प्रकल्प असून यात अमेरिका, युरोप आणि अनेक देशांचे वैज्ञानिक सामील आहेत. वैज्ञानिकांनी लिफ्टबोट रॉबर्ट नावाच्या जहाजाद्वारे केप कॉडनजीक समुद्रात 400 मीटरपर्यंत ड्रिलिंग केले आहे.

 

वैज्ञानिकांनी हजारो नमुने मिळविले असून यात ताजे पाणी मिळाले आहे. हे पाणी न्यूयॉर्क शहराची 800 वर्षांची पाण्याची गरज पूर्ण करू शकते. हवामान बदलामुळे समुद्राची पातळी वाढत असल्याने किनारी भागांमधील पेयजल खारे होत चाललंय. अशास्थितीत समुद्राखालील गोड्या पाण्याचा साठा आशेचा  किरण आहे. हे केवळ अमेरिकेत नव्हे, तर कॅनडा, हवाई, इंडोनेशिया आणि दक्षिण आफ्रिकेसारख्या किनारी क्षेत्रांमध्येही असू शकते.

Advertisement

एक्सपेडिशन 501 ला अमेरिकेच्या नॅशनल सायन्स फौंडेशन आणि युरोपीय कंसोर्टियम फॉर ओशन रिसर्च ड्रिलिंगने निधी पुरविला. हे मिशन 3 महिन्यांपर्यंत चालले, ज्यात लिफ्टबोट रॉबर्ट नावाच्या जहाजाचा वापर झाला, हे जहाज समुद्रतळावर तीन मोठ्या स्तंभांवर टिकून राहते, सर्वसाधारणपणे हे तेल किंवा विंडफार्मसाठी काम करते.

वैज्ञानिकांनी 400 मीटर खोलीवर ड्रिल करत 50 हजार लिटर पाण्याचे नमुने मिळविले. हे पाणी ग्लेशियर्समधून आलेले असू शकते किंवा भूजल व्यवस्थेशी जोडलेले असू शकते. आता हे नमुने जगभरातील प्रयोगशाळेत तपासले जाणार आहेत, जेणेकरून याचे मूळ आणि गुणवत्तेचा शोध लावता येईल.

2015 मध्ये वुड्स होल ओशनोग्राफिक इन्स्टीट्यूशन आणि लॅमॉन्ट-डोहर्टी ऑब्जर्वेटरीने इलेक्ट्रोमॅग्नेटिक टेक्नोलॉजीद्वारे या साठ्याचा नकाशा तयार केला होता. हा साठा अमेरिकेच्या सर्वात मोठ्या ओगलाला अॅक्विफर इतका मोठा असेल, असा अनुमान तेव्हा व्यक्त करण्यात आला होता. ओगलाला अॅक्विफर 8 प्रांतांची तहान भागवत असतो. समुद्राखालील पाणी बाहेर काढणे महाग आणि जटिल आहे, याकरता खास तंत्रज्ञान आणि मोठ्या गुंतवणुकीची आवश्यकता आहे. पाणी बाहेर काढल्यास भूजल पातळी कमी होऊ शकते. समुद्रतळातून निघणारे पाणी सागरी जीवांसाठी आवश्यक घटक पुरवितात असे वैज्ञानिक रॉब इवांस यांनी सांगितले. समाजासाठी शक्य ते सर्व पाण्याचे स्रोत शोधावे लागतील. हा शोध दुष्काळ किंवा वादळाने नष्ट झालेल्या किनारी भागासाठी एक बॅकअप असू शकतो असे या मिशनचे सह-प्रमुख वैज्ञानिक ब्रँडन दुगान यांनी म्हटले आहे.

Advertisement
Tags :

.