महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

बचावकार्यात वारंवार अडथळे

06:50 AM Nov 26, 2023 IST | Tarun Bharat Portal
Frequent obstacles to rescue operations
Advertisement

मजुरांच्या सुटकेसाठी अजूनही प्रतीक्षा : बोगद्यातील लोखंडी साहित्य तोडण्याचे आव्हान

Advertisement

वृत्तसंस्था/ उत्तरकाशी

Advertisement

उत्तराखंडमधील उत्तरकाशी जिल्ह्यात 14 दिवसांपासून निर्माणाधीन सिलक्यारा बोगद्यात अडकलेल्या 41 कामगारांना वाचवण्यासाठी युद्धपातळीवर बचावकार्य सुरू आहे. मात्र, मजुरांना बाहेर काढण्याचा मार्ग अद्याप सुकर झालेला नाही. ड्रिलिंगसाठी अमेरिकन बनावटीच्या ऑगर मशिनचा वापर करण्यात येत असताना  मार्गात वारंवार अडथळे येत असल्याने मोहिमेत गुंतलेले कामगार आता पारंपरिक पद्धतीने हाताने ड्रिलिंग करण्याचा पर्याय वापरण्याच्या बेतात आहेत.

ड्रिलिंगच्या मार्गात वारंवार येणाऱ्या अडथळ्यांमुळे आता बोगद्यात अडकलेल्या कामगारांच्या जवळ पोहोचलेल्या पाईपलाईनमध्ये कामगार स्वत: उतरणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. 47 मीटर खोदकाम पूर्ण झाले आहे. आणखी 10 मीटर ड्रिलिंग करावे लागेल. यासाठी, बचावकार्यात गुंतलेल्या एजन्सीचे कर्मचारी ड्रिलिंगसाठी वापरल्या जाणाऱ्या हातोडा, सेबल, गॅस कटर मशीन आणि सामान्य साधने यांसारख्या पारंपरिक साधनांसह उतरतील. पाईपच्या मार्गात येणारे लोखंडी अडथळे ते हाताने दूर करतील. हे खूप कठीण काम असले तरी त्याला बराच वेळ लागण्याची शक्यता आहे. मात्र, यात यशाची आशा असल्यामुळे बचावपथक आता नव्या दमाने आपल्या माहिमेला गती देणार आहेत.

ड्रिलिंग थांबवण्याची नामुष्की

कामगारांना वाचवण्यासाठी शुक्रवारी रात्री बोगद्याच्या कोसळलेल्या भागात खोदकाम पुन्हा थांबवावे लागले. लोखंडी सळ्या व पत्रे सापडू लागल्यानंतर बचाव पथकाच्या प्रयत्नांना आणखी एक धक्का बसला. शुक्रवारी ड्रिलिंग पुन्हा सुरू झाल्यानंतर काही वेळाने ऑगर मशीनला काही धातूच्या वस्तूमुळे ड्रिल करता न आल्यामुळे काम थांबवावे लागले, असे एका अधिकाऱ्याने सांगितले. त्यापूर्वी गुरुवारी मशीनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने अधिकाऱ्यांना बचावकार्य थांबवावे लागले होते. सततच्या अडथळ्यांमुळे ऑगर मशिनने ड्रिलिंग आणि ढिगाऱ्यांमध्ये स्टील पाईप टाकण्याचे काम बंद असल्याचे त्यांनी सांगितले. अशा परिस्थितीत मॅन्युअल ड्रिलिंगचा विचार केला जात असला तरी त्यासाठी जास्त वेळ लागतो, असे सदर अधिकाऱ्याने सांगितले.

मुख्यमंत्री धामी अपघातस्थळी

उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी स्वत: घटनास्थळी उपस्थित असून बचाव कार्यावर लक्ष ठेवून आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदीही त्यांना या मोहिमेचे अपडेट्स मिळवण्यासाठी नियमित फोन करत आहेत. चारधाम यात्रा मार्गावर बांधण्यात येत असलेल्या या बोगद्याचा काही भाग दिवाळीच्या दिवशी 12 नोव्हेंबर रोजी कोसळल्यामुळे त्यात काम करणारे 41 मजूर भुयारी मार्गाच्या दुसऱ्या बाजूला अडकले आहेत. त्यांच्या बचावासाठी युद्धपातळीवर मोहीम सुरू असली तरी अद्याप यश मिळालेले नाही.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article