फ्रेंच ओपन बॅडमिंटन स्पर्धा आजपासून
सात्विकसाईराज-चिराग शेट्टी पॅरिसमध्ये पुन्हा मोठी मजल मारण्याच्या तयारीत
वृत्तसंस्था/ पॅरिस
आशियातील सातत्यपूर्ण कामगिरीनंतर हुरूप वाढलेली भारताची पुऊष दुहेरीतील प्रमुख जोडी सात्विकसाईराज रान्कीरे•ाr आणि चिराग शेट्टी आज मंगळवारपासून येथे सुरू होणाऱ्या फ्रेंच ओपन सुपर 750 बॅडमिंटन स्पर्धेत मोठी मजल मारण्याचा प्रयत्न करेल.
गेल्या आठवड्यात डेन्मार्क ओपनच्या उपांत्य फेरीत पराभूत होण्यापूर्वी हाँगकाँग आणि चायना मास्टर्स या दोन्ही ठिकाणी अंतिम फेरी गाठलेली ही जागतिक क्रमवारीतील सहाव्या क्रमांकाची जोडी इंडोनेशियन जोडी मुहम्मद रियान अर्दियान्टो आणि रहमत हिदायत यांच्याविऊद्ध खेळेल. हंगामाच्या मध्यास दुखापतींनी सतावल्यानंतर लय पुन्हा मिळविलेले हे भारतीय खेळाडू त्यांच्या अलीकडील फॉर्मचे रूपांतर त्यांच्या आवडत्या ठिकाणी विजेतेपदात करण्याचे उद्दिष्ट ठेवतील. याच ठिकाणी त्यांनी 2022 मध्ये त्यांचा पहिला सुपर 750 मुकुट जिंकला होता आणि पुन्हा 2024 मध्येही तो जिंकण्यात यश मिळविले होते. यावर्षी पॅरिसमध्ये झालेल्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत त्यांनी दुसरे कांस्यपदक जिंकले होते.
इतर खेळाडूंमध्ये हाँगकाँग ओपनच्या अंतिम फेरीत पोहोचलेला लक्ष्य सेन पुन्हा एकदा आयर्लंडच्या न्हाट न्गुयेनविऊद्ध पुऊष एकेरीतील मोहिमेची सुऊवात करेल, तर अमेरिकन ओपन विजेत्या युवा आयुष शेट्टीला जपानच्या कोकी वतानाबेविऊद्ध कठीण आव्हानाला सामोरे जावे लागेल. लक्ष्यने गेल्या आठवड्यात डेन्मार्कमध्ये आयरीश खेळाडूला तीन गेम्समध्कये हरवले होते.
महिला एकेरीत या महिन्याच्या सुऊवातीला आर्क्टिक ओपन सुपर 500 मध्ये उपांत्य फेरीपर्यंत मजल मारून धमाकेदार कामगिरी केलेली उदयोन्मुख स्टार अनमोल खर्ब पहिल्या फेरीत अव्वल मानांकित कोरियाच्या अन से-यंगचा सामना करेल. अनुपमा उपाध्यायची गाठ चौथ्या मानांकित चीनच्या हान यूशी पडेल, तर जागतिक कनिष्ठ स्पर्धेत उपांत्य फेरीत पोहोचलेल्या उन्नती हु•ाची गाठ मलेशियाच्या कऊपाथेवन लेत्शानाशी पडेल. पुऊष दुहेरीत पृथ्वी कृष्णमूर्ती रॉय आणि साई प्रतीक के. यांचाही समावेश आहे, तर महिला दुहेरीत भारतीय खेळाडूंमध्ये म्हणजे कविप्रिया सेल्वम व सिमरन सिंग आणि ऋतुपर्णा आणि श्वेतपर्णा या पांडा बहिणी यांच्यात सामना होईल. मिश्र दुहेरीत ध्रुव कपिला व तनीषा क्रॅस्टो आणि रोहन कपूर व ऊत्विका शिवानी ग•s या जोड्या अनुभवी आंतरराष्ट्रीय जोड्यांवर आपली छाप पाडण्याचा प्रयत्न करतील.