महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

फ्रेंच ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धा उद्यापासून

06:50 AM May 25, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

नदालची सलामीची लढत जर्मनीच्या जर्मनीच्या व्हेरेव्हशी

Advertisement

वृत्तसंस्था/ पॅरीस

Advertisement

2024 च्या टेनिस हंगामातील तिसऱ्या ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेला येथे रविवारपासून प्रारंभ होत आहे. रोलँड गॅरोसच्या रेड क्ले कोर्टवर फ्रेंच ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेत माजी टॉप सिडेड स्पेनचा राफेल नदालला पहिल्याच फेरीत जर्मनीच्या चौथ्या मानांकित अॅलेक्झांडर व्हेरेव्हशी लढत द्यावी लागणार आहे. या स्पर्धेचा ड्रॉ शुक्रवारी काढण्यात आला. या ग्रँडस्लॅम स्पर्धेमध्ये सर्बियाचा नोव्हॅक जोकोविच आणि पोलंडची इगा स्वायटेक हे विद्यमान विजेते आहेत.

या स्पर्धेच्या ड्रॉ नुसार नदालला पहिल्याच फेरीत विजयासाठी चांगलेच झगडावे लागणार आहे. नदालने आतापर्यंत ही स्पर्धा 14 वेळा जिंकली आहे पण गेल्या काही वर्षांमध्ये नदालला वारंवार दुखापतीमुळे टेनिसपासून अलिप्त राहावे लागले असल्याने या स्पर्धेत पहिल्याच फेरीत जर्मनीच्या चौथ्या मानांकित व्हेरेव्हशी कडवा मुकाबला करावा लागेल. फ्रेंच ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेच्या संचालिका अॅमेली मॉरेस्मो यांच्या उपस्थितीत पुरुष आणि महिला एकेरीचा ड्रॉ काढण्यात आला. नदाल 3 जून रोजी 38 व्या वर्षात पदार्पण करत आहे. गेल्या आठ दिवसांच्या कालावधीत नदालने क्ले कोर्टवर टेनिसचा चांगला सराव केला आहे. नदाल आणि व्हेरेव्ह यांच्यातील पहिल्या फेरीतील विजयी खेळाडूचे मार्गक्रमण उपांत्य फेरीपर्यंत पोहोचले तर कदाचित या विजयी खेळाडूला उपांत्य फेरीत सर्बियाचा टॉप सिडेड आणि विद्यमान विजेता जोकोविचशी लढत द्यावी लागेल. जोकोविचचा सलामीचा सामना वाईल्ड कार्डद्वारे प्रवेश मिळविणाऱ्या फ्रान्सच्या हर्बर्टशी होणार आहे. जोकोविच आणि सातवा मानांकित नॉर्वेचा कास्पर रुड यांच्यात उपांत्यपूर्व फेरीत गाठ पडेल असा अंदाज आहे. 2022 च्या फ्रेंच ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेत अंतिम सामन्यात नदालने कास्पर रुडचा पराभव केला होता. तर 2023 च्या फ्रेंच ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेत अंतिम सामन्यात जोकोविचने कास्पर रुडला पराभूत करून जेतेपद मिळवले होते.

इटलीचा जेनिक सिनेर, स्पेनचा हुरकेझ त्याचप्रमाणे कार्लोस अल्कारेझ रशियाचा रुबलेव, मेदव्हेदेव्ह यांच्याकडूनही चांगल्या कामगिरीची अपेक्षा असून पहिल्या फेरीपासूनच धक्कादायक निकाल पाहावयास मिळतील असा तर्क व्यक्त केला जात आहे. ब्रिटनच्या माजी टॉप सिडेड 37 वर्षीय अँडी मरे तसेच स्वीसचा 39 वर्षीय वावरिंका यांच्यात पहिल्या फेरीतील सामना होणार आहे.

स्वायटेक हॅट्ट्रिक करणार?

महिला एकेरीचा ड्रॉ काढण्यात आला असून पोलंडची टॉप सिडेड इगा स्वायटेक हिने यापूर्वी सलग दोनवेळा फ्रेंच ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धा जिंकली असून आता ती या स्पर्धेत जेतेपदाची हॅट्ट्रिक साधण्यासाठी सज्ज झाली आहे. दोन वर्षापूर्वी या स्पर्धेत झालेल्या महिला एकेरीच्या अंतिम सामन्यात अमेरिकेच्या तृतीय मानांकित कोको गॉफला स्वायटेकने पराभूत केले होते. कोको गॉफही अमेरिकन ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेतील विद्यमान विजेती आहे. जपानच्या नाओमी ओसाकाची गाठ उपांत्यपूर्व फेरीत कदाचित स्वायटेकशी पडेल असा अंदाज आहे. त्याचप्रमाणे मर्केटा व्होंड्रोसोवा, गॉफ, जेबॉर हे वरच्या अर्ध्या टप्प्यामध्ये तर साबालेंका, इटलीची मारिया सॅकेरी, रायबाकिना व चीनची झेंग क्विनवेन या टेनिसपटू तळाच्या अर्ध्या टप्प्यात आहेत.

महिलांच्या विभागात ऑस्ट्रेलियन ग्रँडस्लॅम स्पर्धेतील उपविजेती झेंग आणि फ्रान्सची कॉर्नेट यांच्यात सलामीचा सामना होणार आहे. या स्पर्धेनंतर फ्रान्सची कॉर्नेट टेनिस क्षेत्रातून निवृत्त होणार आहे. प्लिस्कोव्हा व स्विटोलिना तसेच पेगुला या स्पर्धेत दर्जेदार कामगिरी करतील असा अंदाज आहे. स्पेनच्या नदालने या स्पर्धेत आतापर्यंत भरघोस यश मिळवले असून त्याने आतापर्यंत 112 सामने जिंकले असून तीन सामने गमवले आहेत.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article