For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

लेझर रायफलचे फ्रान्सच्या सैन्याकडून परीक्षण

06:33 AM Apr 19, 2025 IST | Tarun Bharat Portal
लेझर रायफलचे फ्रान्सच्या सैन्याकडून परीक्षण
Advertisement

► वृत्तसंस्था/ पॅरिस

Advertisement

हेल्मा-एलपी एक शक्तिशाली लेझर रायफल असून ती विशेष स्वरुपात सामरिक मोहिमांसाठी डिझाइन करण्यात आली आहे. ही प्रणाली एक बॅकपॅकमध्ये ठेवण्यात आलेल्या रिचार्जेबल बॅटरीने संचालित होणार असून 60 सेकंदांपर्यंत सातत्याने काम करू शकते. हेल्मा-आयपी लेझर रायफल हेल्मा-पी प्रणालीद्वारे विकसित करण्यात आली आहे, जे एक शक्तिशाली लेझर असून ज्याचे परीक्षण फ्रान्सच्या नौदलाकडून करण्यात आले आहे. 2024 च्या ऑलिम्पिक स्पर्धेदरम्यान पॅरिसला छोट्या ड्रोनच्या धोक्यांपासून वाचविण्यासाठी या प्रणालीला तैनात करण्यात आले होते.

लेझर रायफल एआर-15 प्लॅटफॉर्मने प्रेरित असून जे दोन केबल्सच्या माध्यमातून 15 किलोग्रॅमच्या बॅकपॅकशी जोडलेले आहे आणि यात रिचार्जेबल बॅटरी आहे. परंतु बॅटरीयच तांत्रिक विनिर्देशांचा खुलासा करण्यात आलेला नाही. हेल्मा-एलपी पारंपरिक लेझर सिस्टीमपेक्षा वेगळी आहे, जे मुख्यत्वे उडणाऱ्या ड्रोनला नष्ट करण्यासाठी डिझाइन करण्यात आले आहे.

Advertisement

शत्रूला चकित करणार

हेल्मा-एलपी जमीन-आधारित उपकरणांना निष्प्रभ करण्यासाठी देखील डिझाइन करण्यात आले आहे, कॅमोफ्लोज,  इलेक्ट्रॉनिक सेंसर, कॉम्प्युरट, टेहळणी कॅमेरे,  रेडिओ ऑप्ट्रोनिक सिस्टीम्स देखील या रायफलने नष्ट करता येणार आहे. लेझर प्रभावाद्वारे तात्पुरत्या अंधत्वापासून इलेक्ट्रॉनिक विनाश देखील करता येणार आहे. रा रायफलमुळे युद्धभुमीवर शत्रूला धक्का बसणार आहे, यामुळे शत्रूवर मनोवैज्ञानिक प्रभाव पडणार आहे. तसेच शत्रूला हल्ल्याचा स्रोत जाणून घेता येणार नाही.

हेल्मा-एलपीची वैशिष्ट्यो, उपयुक्तता

हेल्मा-एलपीच्या स्टेल्थ वैशिष्ट्यामुळे याला विशेष मोहिमांसाठी उपयुक्तता प्राप्त होते. हे अस्त्र दूर अंतरावरून विस्फोट करणे किंवा शत्रूच्या तळावरील महत्त्वपूर्ण सामग्रीला अक्षम करण्यास देखील वापरले जाऊ शकते.

-तापमान मर्यादा - 20 ते 35 अंश सेल्सिअस

-हवाई परिवहन योग्य

-सीआयएलएएसने रिमोट-कंट्रोल शस्त्र स्थानकांच्या (आरसीडब्ल्यूएस) निर्मात्यांशी संपर्क साधला असून जे हेल्मा-एलपीला रोबोटिक प्लॅटफॉर्ममध्ये एकीकृत करण्यास रुची बाळगून आहेत.

-अशाप्रकारच्या एकीकरणामुळे सिस्टीमच्या संभाव्य वापराचा विस्तार होऊ शकतो, यामुळे हे वाहने किंवा ड्रोनच्या मदतीने देखील वापरले जाऊ शकते.

Advertisement
Tags :

.