Belgaum News: राजू सेठ फाउंडेशनचा उपक्रम, फेरीवाल्यांना दिलासा देणाऱ्या छत्र्यांचे वाटप
या उपक्रमामुळे अनेक विक्रेत्यांना दिलासा मिळाला आहे.
बेळगाव : बेळगाव उत्तर मतदारसंघात गोरगरीब कामगार आणि फेरीवाल्यांच्या हितासाठी राजू सेठ फाउंडेशनने एक स्तुत्य उपक्रम राबवला आहे. अवकाळी पावसामुळे त्रस्त असलेल्या रस्त्यावरील फेरीवाले व भाजी विक्रेत्यांना छत्र्यांचे मोफत वाटप करण्यात आले.
या उपक्रमामुळे अनेक विक्रेत्यांना दिलासा मिळाला असून, त्यांना आपल्या व्यवसायात अडथळा न येता काम करता येणार आहे. समाजसेवक कलीमुल्ला मुल्ला यांच्या नेतृत्वाखाली हा उपक्रम यशस्वीरीत्या पार पडला. त्यांनी स्वतः बाजारपेठांमध्ये जाऊन विक्रेत्यांना छत्र्या वितरित केल्या.
विशेषतः पावसाळ्यात उघड्यावर काम करणाऱ्या कष्टकरी वर्गाला आधार देण्याचा या उपक्रमाचा हेतू आहे.आमदार आसिफ (राजू) सेठ यांच्या मार्गदर्शनाखाली फाउंडेशनकडून सामाजिक उत्तरदायित्वाचे भान राखत नियमितपणे अशा उपक्रमांचे आयोजन केले जात आहे. कामगार वर्गाचा सन्मान राखणे आणि त्याच्या कल्याणासाठी प्रयत्नशील राहणे हेच फाउंडेशनचे प्रमुख ध्येय आहे.
छत्र्या मिळालेल्या विक्रेत्यांनी वेळेवर मिळालेल्या मदतीबद्दल आनंद व्यक्त केला असून, फाउंडेशनच्या कार्याची प्रशंसा केली आहे. अशा उपक्रमांमुळे आमच्या अडचणी समजून घेतल्या जातात, असे प्रतिपादन काही फेरीवाल्यांनी केले. राजू सेठ फाउंडेशनचा हा उपक्रम इतरांसाठीही प्रेरणादायी ठरत आहे.