सीपीआरमध्ये होणार मोफत शस्त्रक्रिया
कोल्हापूर :
प्रसिद्ध रोबोटिक व लॅपरोस्कोपिक सर्जन डॉ. मुफ्फझल लकडावाला यांच्याद्वारे हर्निया, अॅपेंडिक्स, पित्ताशय व गर्भाशयावरील मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. छत्रपती प्रमिलाराजे रूग्णालयातच (सीपीआर) या चारही प्रकारच्या विकारांवर शस्त्रक्रिया केल्या जाणार आहे. तेव्हा संबंधित रूग्ण किंवा नातेवाईकांनी शस्त्रक्रीया करवून घेण्यासाठी आपल्या नावाची लवकरात लवकर नोंदणी करावी असे आवाहन वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी सोमवारी केले.
शस्त्रक्रीयांच्या पार्श्वभूमीवर शेंडापार्कतील छत्रपती राजर्षी शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात विशेष बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीत मुश्रीफ यांनी वरील आवाहन केले आहे.
मंत्री मुश्रीफ म्हणाले, सीपीआरमध्येच शस्त्रक्रिया कॅम्पचे आयोजन केले आहे. पहिल्या टप्प्यात 50 शस्त्रक्रिया केल्या जाणार आहेत. यानंतर रूग्णसंख्येचा विचार करून पुढिल शस्त्रक्रिया कॅम्पचे आयोजन केले जाईल. शस्त्रक्रीया करवून घेण्याच्या प्रक्रीयेत ऊग्णांना सहजासहजी सहभागी होता यावे म्हणून सीपीआरमधील ओपीडी 107, जिल्हा परिषदेतील जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय, ग्रामीण रुग्णालय, कोल्हापूर महानगरपालिकेचा आरोग्य विभाग येथे आपल्या नावाची नोंदणी करण्याचे आवाहन केले आहे.
यानंतर बोलताना मुश्रीफ म्हणाले, लॅपरोस्कोपीकद्वारे केली जाणारी शस्त्रक्रिया ही विनाछेद असते. त्यामुळे हर्निया, अपेंडिक्स, पित्ताशय, गर्भाशयाचा त्रास असलेल्या महिला व पुऊष ऊग्णांनी अजिबात घाबरून न जाता मोफत शस्त्रक्रिया करवून घेण्यासाठी स्वयंस्फुर्तीने पुढाकार घ्यावा. या बैठकीला अतिरिक्त जिल्हाधिकारी संजय शिंदे, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सत्यवान मोरे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुप्रिया देशमुख, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरूद्ध पिंपळे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. शिशिर मिरगुंडे, आरोग्य अधिकारी डॉ. प्रकाश पावरा यांच्यासह अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी, सर्व वैद्यकीय अधीक्षक, तालुका आरोग्य अधिकारी उपस्थित होते.
- डॉ. मुफज्जल लकडावाला यांची माहिती
डॉ. मुफी या नावाने डॉ. मुफ्फझल लकडावाला हे वैद्यकीय क्षेत्रात परिचीत आहेत. त्यांना भारतातील प्रसिद्ध लॅपरोस्कोपिक सर्जन असून बॅरिएट्रिक, गॅस्ट्रो-इंटेस्टाइनल शस्त्रक्रियांमध्ये विशेषज्ञ म्हणून ओळखले जाते. डायजेस्टिव्ह हेल्थ इन्स्टिट्यूटचे सह-संस्थापक आणि मुख्य शल्यचिकित्सक म्हणूनही ते कार्यरत आहेत. त्यांना 2019 मध्ये अमेरिकन सोसायटी फॉर मेटाबॉलिक अँड बॅरिएट्रिक सर्जरीतर्फे जगातील सर्वोत्कृष्ट सर्जन पुरस्कार आणि इंटरनॅशनल फेडरेशन फॉर द सर्जरी ऑफ द वर्ल्ड मास्टर एज्युकेटर या पुरस्काराने गौरवले आहे. त्यांनी भारतासह आंतरराष्ट्रीयस्तरावर 50 हजारांहून अधिक ऊग्णांवर चांगल्या पद्धतीने शस्त्रक्रीया कऊन त्यांचे प्राण वाचवले आहेत.