कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

2 वर्षांपर्यंत करवित होता फ्री ऑर्डर

07:00 AM Oct 24, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

मोफत ऑनलाइन खाद्यपदार्थ मागवून अॅपला घातला गंडा

Advertisement

जपानमध्ये एका इसमाने फूड डिलिव्हरी अॅपद्वारे 2 वर्षांमध्ये 1 हजार वेळा मोफत खाद्यपदार्थांवर ताव मारला आहे. ऑर्डर केल्यावरही त्याचे पैसे परत मिळत होते. अशाप्रकारे तो दोन वर्षांपर्यंत मोफत ऑनलाइन खाद्यपदार्थ मागवत राहिला. एका इसमाने फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्मच्या रिफंड पॉलिसीचा लाभ घेत 2 वर्षांमध्ये 1 हजार वेळा मोफत अन्नावर ताव मारला आहे. बेरोजगार इसम डिलिव्हरी प्लॅटफॉर्मवर 124 अकौंट्स हाताळत होता. ओळख लपविण्यासाठी नियमित स्वरुपात तो साइन अप करायचा आणि काही दिवसांतच सदस्यत्व रद्द करायचा.

Advertisement

कंपनीला 21 लाख रुपयांचा चुना

जपानमध्ये 38 वर्षीय या इसमाला एका फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्ममधील त्रुटींचा लाभ घेत फसवणूक केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. त्याने कंपनीला 3.7 दशलक्ष येन म्हणजेच 21 लाख रुपयांपेक्षा अधिक रकमेला फसविले आहे.

1095 वेळा ऑर्डरचा घेतला रिफंड

आइची प्रांताच्या नागोयामध्ये ताकुया हिमाशिमोतो याला फूड डिलिव्हरी सर्व्हिस कंपनीकडून 1095 ऑर्डर करणे, सर्व खाद्यपदार्थ खाणे तसेच पेमेंट टाळण्यासाठी ट्रिकचा वापर केल्याप्रकरणी अधिकाऱ्यांनी अटक केली आहे. तो स्वत:च्या ऑर्डर स्वीकारत होता आणि त्याचा रिफंड देखील. त्याने ऑर्डर फ्री करविण्यासाठी एक ट्रिक अवलंबिली होती. तो प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून कॉन्टॅक्टलेस डिलिव्हरीचा पर्याय वापरायचा. मग रिफंड घेण्यासाठी अॅपच्या माध्यमातून खाद्यपदार्थ पोहोचलेच नसल्याचा खोटा दावा करायचा. हिगाशिमोताने डेमा-कॅन अॅपवर एक बनावट नाव आणि पत्त्याने नवे अकौंट तयार केले, परंतु त्याच्या ऑर्डरमधील आइस्क्रीम, बेंटो आणि चिकन स्टेक डिलिव्हर झाले होते, त्याने अॅपच्या चॅट फिचरचा वापर करत खाद्यपदार्थ पोहोचलेच नसल्याचा दावा केला, मग त्याच दिवशी त्याला 16 हजार येनचा रिफंड मिळाला होता.

अनेक वर्षांपासून होता बेरोजगार

हिगाशिमोतो अनेक वर्षांपासून बेरोजगार आहे. त्याने एप्रिल 2023 पासून स्वत:च्या फसवणुकीच्या कृत्यांना सुविधाजनक करण्यासाठी प्लॅटफॉर्मवर 124 अकौंट्स तयार केली होती. साइन अप केल्याच्या काही दिवसांनी तो सदस्यत्व रद्द करत होता. स्वत:ची ओळख जाहीर न करण्याच्या क्षमतेमुळे त्याला पकडणे  अवघड ठरले होते, कारण त्याने अनेक प्रीपेड मोबाइल फोन कार्ड खरेदी केले होते, खोटे नाव आणि पत्त्याद्वारे नोंदणी करत तो ती त्वरित रद्द करत होता.

गुन्हा केल्या मान्य

प्रारंभी मी केवळ हीच पद्धत अवलंबिली होती, असे हिगाशिमोतोने मान्य केले आहे. गुन्हा उघड झाल्यावर डेमा-कॅनने ग्राहकाच्या ओळखीची पडताळणी करण्याची प्रक्रिया प्रभावी करण्याचा संकल्प घेतला आहे. असामान्य व्यापारी घडामोडींचा शोध घेणे आणि भविष्यात अशाप्रकारच्या घोटाळ्यांना रोखण्यासाठी अलर्ट सिस्टीम लागू करणार असल्याचे प्लॅटफॉर्मने म्हटले आहे. चीन आणि जपानमध्ये या घटनेने खळबळ उडवून दिली आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article