हिंडलगा लोकमान्य मल्टिपर्पज सोसायटीतर्फे मोफत आरोग्य तपासणी
वार्ताहर/हिंडलगा
येथील लोकमान्य मल्टिपर्पज सोसायटीच्या वतीने हिंडलगा पंचक्रोशीतील नागरिकांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले हेते. या शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी हभप बाबू नाईक, श्रीमती जाधव, श्रीमती पावशे उपस्थित होत्या. शाखेचे व्यवस्थापक सचिन कावळे यांनी सर्वांचे स्वागत करून उपस्थित डॉक्टरांचा परिचय करून दिला. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. डॉ. विद्या व्ही. आर. यांनी तपासणी बाबतची माहिती दिली. तसेच वेळोवेळी आपली आरोग्य तपासणी करून घेणे अत्यंत महत्त्वाचे असून ज्येष्ठ नागरिकांनी या नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले.
विनायकनगर लोकमान्य सोसायटीचे व्यवस्थापक किशोर हळदणकर यांनी या आरोग्य तपासणीला शुभेच्छा दिल्या. डी. एम. ए. .प्रकाश बेळगुंदकर यांनी या शिबिराचे महत्त्व पटवून दिले. हिंडलगा येथे लोकमान्य सोसायटीची सहावी शाखा स्थापना करून सोसायटीचे संस्थापक चेअरमन डॉ. किरण ठाकुर यांनी या भागात विविध प्रकारच्या सेवा देऊन खास शेतकऱ्यांसाठी विविध शिबिरे आजपर्यंत भरवून सहकार्य केले आहे, असे सांगितले. आरोग्य तपासणीसाठी दत्ता बिर्जे, सीमा रेडेकर, अश्विनी गोरल यांनी डॉ. विद्या व्ही. आर. यांनी सहकार्य केले. असिस्टंट मॅनेजर रही जाधव यांनी आभार मानले. सूत्रसंचालन ओमकार कुलकर्णी यांनी केले. शिबिर यशस्वी करण्यासाठी उमेश वेताळ, तेजस्विनी देसाई, भूषण बर्डे, भाऊ कुऱ्हाडे, राजू कडेमणी यांनी सहकार्य केले. या शिबिराला मोठ्या संख्येने गावातील व परिसरातील नागरिकांनी व महिलांनी गर्दी केली होती.