महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

सावंतवाडीतील पत्रकार आणि कुटुंबीयांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर

10:49 AM Dec 08, 2024 IST | अनुजा कुडतरकर
Advertisement

९ डिसेंबरला आयोजन

Advertisement

सावंतवाडी

Advertisement

सावंतवाडी तालुक्यातील पत्रकार आणि त्यांच्या कुटुंबीयांचे मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन सोमवारी ९ डिसेंबर रोजी सकाळी साडेआठ वाजता करण्यात आले आहे . सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयांमध्ये होणाऱ्या या आरोग्य तपासणी शिबिराचे उद्घाटन:सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष श्री उमेश तोरस्कर यांच्या हस्ते होणार आहे तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ पत्रकार श्री अभिमन्यू लोंढे हे असणार आहेत. या वेळी प्रमुख उपस्थितीत नवयुग एज्युकेशन सोसायटी सावंतवाडीचे :संस्थापक अध्यक्ष श्री उदय भोसले,मराठी पत्रकार परिषद, मुंबईचे माजी राज्य अध्यक्ष गजानन नाईक,ज्येष्ठ पत्रकारश्री वसंत उर्फ अण्णा केसरकर, सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाचे खजिनदार ऍड. संतोष सावंत, सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाचे सहकार्यवाह तथा युवा नाट्यकर्मी श्री प्रवीण मांजरेकर, तसेच उपजिल्हा रुग्णालय सावंतवाडी.वैद्यकीय अधीक्षक डॉ गिरीश चौगुले,, स्त्री रोग तज्ञ डॉ ज्ञानेश्वर ऐवळे यांना निमंत्रित करण्यात आले आहे. तरी सर्वांनी वेळेत उपस्थित रहावे असे आवाहन सावंतवाडी तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष हरिश्चंद्र पवार सचिव मयूर चराटकर,खजिनदार रामचंद्र कुडाळकर यांनी केले आहे.

 

Advertisement
Tags :
# tarun bharat sindhudurg # konkan update
Next Article