लोककल्पतर्फे अंबोली येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिर
बेळगाव : लोककल्प फाउंडेशन आणि बेळगाव येथील वेणुग्राम हॉस्पिटल यांच्या साहाय्याने अंबोली येथे मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. सुमारे 60 हून अधिक गावकऱ्यांनी या शिबिराचा लाभ घेतला. यावेळी सर्वसाधारण आरोग्य तपासणी, विविध चाचण्या तसेच वैद्यकीय सल्लामसलत करण्यात आली. ग्रामीण भागातील नागरिकांना मूलभूत आरोग्य सेवा पुरविण्याच्या उद्देशाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. वेणुग्राम हॉस्पिटलच्या डॉ. विनुता, डॉ. कृतिका, परिचारक बसवराज, पीआरओ योगेश यांनी वैद्यकीय सुविधा पुरविल्या.
लोककल्प फौंडेशनचे संतोष कदम व संदीप पाटील यांनी समन्वयक म्हणून काम पाहिले. लोकमान्य मल्टीपर्पज को-ऑप. सोसायटीचे चेअरमन डॉ. किरण ठाकुर यांच्या प्रेरणेतून हा उपक्रम राबविण्यात आला. सोसायटीच्या ‘सीएसआर’ या उपक्रमांतर्गत ग्रामीण भागातील नागरिकांना जीवनावश्यक मूलभूत गरजांची पूर्तता करून देणे हा आहे. तसेच ग्रामीण नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी लोककल्प फौंडेशन सातत्याने प्रयत्न करीत असून हा संकल्प पुढील काळातही कायम राहणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.