कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

लोककल्पतर्फे बेटणे येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिर

11:04 AM Nov 20, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

बेळगाव : लोककल्प फौंडेशनतर्फे केएलई आयुर्वेदिक हॉस्पिटल यांच्या साहाय्याने बेटणे (ता. खानापूर) येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. ग्रामीण भागातील नागरिकांना दर्जेदार आरोग्य सेवा प्रदान करण्याच्या उद्देशाने  शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सुमारे 60 हून अधिक गावकऱ्यांनी या शिबिराचा लाभ घेतला. यावेळी आयुर्वेदिक हॉस्पिटलच्या डॉ. आकांक्षा मिश्रा, डॉ. शोल्ले कुरुविल्ला, डॉ. वेदांत गायकवाड, श्रीधर के. व नारायन यांनी वैद्यकीय सेवा दिली. लोककल्पचे अनंत गावडे आणि संदीप पाटील यांनी समन्वयक म्हणून काम पाहिले.

Advertisement

लोकमान्य मल्टीपर्पज को-ऑप. सोसायटीचे चेअरमन डॉ. किरण ठाकुर यांच्या प्रेरणेतून हा उपक्रम राबविण्यात आला. सोसायटीच्या ‘सीएसआर’ या उपक्रमांतर्गत खानापूर तालुक्यातील 32 गावांना दत्तक घेतले आहे. या गावांमधील नागरिकांना आरोग्य, शिक्षण व पायाभूत सुविधांची पूर्तता करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविला जात आहे. लोककल्पतर्फे या गावांतील नागरिकांचे जीवनमान उंचावण्याचे, सकारात्मक बदल घडविण्याचे कार्य सातत्याने होत असून ग्रामीण स्तरावर अर्थपूर्ण सामाजिक परिवर्तन घडविले जात आहे.

Advertisement

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article