लोककल्पतर्फे हंदीकोप्पवाडा येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिर
12:17 PM Nov 25, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
बेळगाव : लोककल्प फौंडेशनतर्फे वेणुग्राम हॉस्पिटल यांच्या साहाय्याने हंदीकोप्पवाडा (ता. खानापूर) येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. यावेळी सुमारे 40 हून अधिक ग्रामस्थांनी या शिबिराचा लाभ घेतला. यावेळी रक्तदाब, मधुमेह आणि विविध आजारावर सल्लामसलत करण्यात आली. शिबिरामध्ये वेणुग्राम हॉस्पिटलच्या डॉ. स्नेहल केदार, दिव्या चिंगळी, श्रीकांत पाटील, डॉ. कृतिका कोळी यांनी आरोग्य सेवा दिली. तसेच लोककल्प फौंडेशनचे अनंत गावडे आणि संदीप पाटील यांनी समन्वयक म्हणून काम पाहिले. लोककल्प फौंडेशनच्या ‘सीएसआर’ या उपक्रमांतर्गत खानापूर तालुक्यातील 32 गावांना दत्तक घेण्यात आले आहे. ग्रामीण भागातील नागरिकांना जीवनावश्यक मूलभूत गरजा, आरोग्य, शिक्षण यांची पूर्तता करून त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी लोककल्प फौंडेशन सातत्याने प्रयत्न करीत आहे.
Advertisement
Advertisement