लोककल्पतर्फे चिगुळे येथे मोफत आरोग्य तपासणी
बेळगाव : लोककल्प फौंडेशनतर्फे वेणुग्राम हॉस्पिटल यांच्या साहाय्याने चिगुळे (ता. खानापूर) येथे मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन केले होते. गावातील 60 हून अधिक नागरिकांनी शिबिराचा लाभ घेतला. यावेळी वैद्यकीय तपासण्या, आरोग्यविषयक मार्गदर्शन तसेच आरोग्याबद्दल जनजागृती करण्यात आली. ग्रामीण भागात आरोग्याबाबत जागरुकता वाढविणे हा शिबिराचा उद्देश होता. शिबिरामध्ये वेणुग्राम हॉस्पिटलच्या डॉ. स्नेहल, डॉ. कृतिका कोळी, बसवराज आणि पीआरओ जगदीश बेळगावकर यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. लोककल्पचे संतोष कदम व संदीप पाटील यांनी समन्वयक म्हणून काम पाहिले. लोकमान्यचे चेअरमन डॉ. किरण ठाकुर यांच्या प्रयत्नातून हा उपक्रम राबविला. ग्रामीण नागरिकांना मूलभूत आरोग्यसेवा, शिक्षण, रोजगाराच्या संधी व पायाभूत सुविधा उपलब्ध करून देणे हे त्यांचे ध्येय आहे. याअंतर्गत चिगुळे येथे आरोग्य शिबिराचे आयोजन केले होते.