लोककल्पतर्फे नेरसे येथे मोफत आरोग्य शिबिर
बेळगाव : ग्रामीण भागातील नागरिकांना मूलभूत आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने लोककल्पतर्फे अरिहंत हॉस्पिटलच्या साहाय्याने नेरसे (ता. खानापूर) येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. सुमारे 40 हून अधिक नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतला. शिबिरादरम्यान आरोग्याविषयी सल्लामसलत व प्राथमिक आरोग्य तपासण्या अशा विविध सेवा देण्यात आल्या.यावेळी अरिहंत हॉस्पिटलच्या डॉ. मुक्ती पटेल, परिचारिका लक्ष्मी पाटील, तेजस्विनी पायन्नावर व मल्लिकार्जुन यादवाड यांनी सेवा बजावली. तसेच लोककल्पचे संतोष कदम व संदीप पाटील यांनी समन्वयक म्हणून काम पाहिले. हा उपक्रम लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटीचे अध्यक्ष डॉ. किरण ठाकुर यांच्या प्रेरणेतून राबविण्यात आला. त्यांच्या मार्गदर्शनामुळे विविध समाजकल्याण उपक्रमांना चालना मिळत आहे. लेककल्प फौंडेशनतर्फे वैद्यकीय पथक, ग्रामस्थ व स्वयंसेवकांचे आभार व्यक्त करण्यात आले.