कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

‘लोकमान्य’च्या सीएसआर उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांची मोफत नेत्रतपासणी

12:52 PM Dec 10, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

बेळगाव : लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटी लि.यांच्या सीएसआर उपक्रमांतर्गत लोककल्प फौंडेशनतर्फे तात्यासाहेब मुसळे विद्यालय कन्नड माध्यम कॉन्व्हेंट स्कूल येथे आनंदनगर येथील लोकमान्य सोसायटी शाखेच्या साहाय्याने आणि नेत्रदर्शन सुपर स्पेशालिटी आय हॉस्पिटल (डॉ. अगरवाल आय हॉस्पिटल) यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शालेय विद्यार्थी व कर्मचारी यांच्यात डोळ्यांच्या आरोग्याबाबत जागरुकता निर्माण करणे, तसेच दृष्टीसंबंधी समस्या लवकर ओळखण्यास मदत करणे हा या शिबिराचा मुख्य उद्देश होता. सुमारे 300 हून अधिक लाभार्थ्यांनी या शिबिराचा लाभ घेतला. यावेळी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका शिल्पा कवडी, आनंदनगर वडगाव शाखा व्यवस्थापक तेजश्री होस्कली, साहाय्यक शाखा व्यवस्थापक स्मिता जाधव, सीएसआर निशांत जाधव उपस्थित होते. शिबिरामध्ये वैद्यकीय पथकाने विद्यार्थ्यांमध्ये कमी दृष्टी, मोतीबिंदू तसेच इतर अपवर्तन त्रुटी यांसारख्या डोळ्यांच्या समस्या ओळखून पुढील उपचारांसाठी आवश्यक सल्लामसलत केली. लोककल्पतर्फे समाजकल्याण, आरोग्य आणि इतर मूलभूत सेवा पुरविण्याच्या उद्देशातून अशा प्रकारचे उपक्रम राबविले जात असतात.

Advertisement

Advertisement
Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article