लोककल्पतर्फे देवाचीहट्टी येथे मोफत नेत्र तपासणी शिबिर
बेळगाव : लोककल्प फौंडेशनतर्फे नेत्रदर्शन सुपर स्पेशालिटी आय हॉस्पिटल यांच्या साहाय्याने बुधवार दि. 15 ऑक्टोबर रोजी देवाचीहट्टी (ता. खानापूर) येथे मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिरात सुमारे 40 हून अधिक ग्रामस्थांची मोफत नेत्र तपासणी, दृष्टी चाचणी, सल्लामसलत करण्यात आली. ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये नेत्र आरोग्य सुधारणा आणि दृष्टीदोषांचे निदान व्हावे यासाठी हा उपक्रम राबविण्यात आला. नेत्रदर्शनच्या डॉ. सबा राजगोळी, उदयकुमार आणि आदित्य अलगुडीकर यांनी सेवा दिली. लोककल्प फौंडेशनतर्फे संतोष कदम आणि संदीप पाटील यांनी समन्वयक म्हणून काम पाहिले. हा उपक्रम लोकमान्य मल्टिपर्पज सोसायटी लि. चे अध्यक्ष किरण ठाकुर यांच्या प्रेरणेने राबविण्यात आला असून, ग्रामीण व गरजू नागरिकांना दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध करून देणे हा त्यांचा हेतू आहे.