लोककल्पतर्फे कणकुंबी येथील रुग्णांची मोतिबिंदूची मोफत शस्त्रक्रिया
बेळगाव : लोककल्प फौंडेशनतर्फे नेत्रदर्शन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल (डॉ. अग्रवाल आय हॉस्पिट युनिट) यांच्या सहकार्याने कणकुंबी गावातील दोन रुग्णांची मातीबिंदूची मोफत शस्त्रक्रिया करण्यात आली. ही शस्त्रक्रिया डॉ. जगदीश पाटील यांनी कौशल्यपूर्णरित्या केली. या उपक्रमात नेत्रदर्शनचे असिस्टंट मॅनेजर उदयकुमार आणि राजू माजली यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. लोककल्पचे अनिकेत पाटील आणि प्रितेश पोतेकर यांनी समन्वयक म्हणून कार्य पाहिले. लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटी लि.चे चेअरमन डॉ. किरण ठाकुर यांच्या प्रयत्नातून हा उपक्रम राबविण्यात आला. ग्रामीण भागातील नागरिकांना प्रगत नेत्रवैद्यकीय सेवा उपलब्ध करून देणे हा या प्रयत्नामागचा उद्देश होता. या उपक्रमामुळे रुग्णांच्या जीवनमानात सुधारणा झाली असून रुग्ण व त्यांच्या कुटुंबीयांनी मन:पूर्वक आभार व्यक्त केले.