महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

छोट्या व्यावसायिकांची स्वनिधीतून फसवणूक

10:27 AM Jul 11, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

छोट्या व्यावसायिकांचे मनपाला निवेदन

Advertisement

बेळगाव : शहरात रस्त्यावर बसून व्यवसाय करणाऱ्यांना पीएम स्वनिधीतून कर्ज दिले जाते. मात्र हे कर्ज भरून घेताना या छोट्या व्यावसायिकांची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून मनपातील त्या अधिकाऱ्यांवर आणि एजंटांवर कारवाई करावी या मागणीसाठी कर्ज घेतलेल्या व्यावसायिकांनी महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना निवेदन दिले. भाजी विक्रेते तसेच इतर विक्रेत्यांना पंतप्रधान स्वनिधीतून 10 हजारपासून 50 हजारापर्यंत कर्ज दिले जाते. बऱ्याच जणांनी हे कर्ज घेतले आहे. कर्ज दिल्यानंतर महापालिकेतील अधिकाऱ्यांनी रुरल बँक (फिनिकल फायनान्सच्या) महेंद्र यांच्याकडे कर्ज भरा, असे सांगितले होते. त्यानुसार व्यावसायिकांनी दररोज पिग्मी जमा केली. मात्र बँकेत ती पिग्मीच जमा केली नाही. याबाबत अधिकाऱ्यांना विचारले असता संबंधित एजंट सध्या आजारी आहे. लवकरच तो रक्कम भरेल असे सांगितले.

Advertisement

एजंट-अधिकाऱ्यांकडून फसवणुकीचा आरोप

व्यावसायिकांनी मनपा अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता ते उडवाउडवीची उत्तरे देत आहेत, असा आरोप व्यावसायिकांनी केला आहे. 10 हजार कर्ज परतफेड केल्यानंतर 20 हजार रुपये कर्ज देण्यात येणार होते. मात्र एजंटानेच व महानगरपालिकेतील अधिकाऱ्यांनीच आपली फसवणूक केल्याचा आरोप या निवेदनात केला आहे. 1100 रुपये शेअर्स म्हणूनही रक्कम जमा करण्यात आल्याचेही यावेळी व्यावसायिकांनी सांगितले. मनपाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने याकडे लक्ष देऊन आम्हाला न्याय्य द्यावा, अशी मागणी करण्यात आली. यावेळी प्रसाद कावळेकर, इमाम हुसेन नदाफ, भरमाण्णा नाईक, शिवानंद नष्टी, श्रीहर्ष गौडर, पांडुरंग मेणसे, रामदास कटारे, ललिता मोगरे व व्यावसायिक उपस्थित होते.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article