For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणुकीच्या आमिषाने १. १० कोटींची फसवणूक

03:59 PM Jun 05, 2025 IST | Radhika Patil
स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणुकीच्या आमिषाने १  १० कोटींची फसवणूक
Advertisement

कराड :

Advertisement

फोरेक्स स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणुकीवर आकर्षक परताव्याचे आमिष दाखवून येथील निवृत्त एअरफोर्स अधिकारी माधव काळे यांची तब्बल १ कोटी १० लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

याप्रकरणी दीपक बाळकृष्ण यादव (रा. सोळशी, ता. कोरेगाव) व किशोर अधिकराव पिसाळ (रा. करवडी) या दोघांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी माधव मनोहर काळे (वय ६१, रा. शुक्रवार पेठ, कराड) यांनी कराड शहर पोलिसात फिर्याद दिली आहे. या फिर्यादीनुसार काळे हे सेवानिवृत्तीनंतर खासगी कंपनीत काम करत होते. जानेवारी २०२३ मध्ये त्यांची ओळख किशोर पिसाळ यांच्याशी झाली. पिसाळ यांनी स्वतःला आर्मीतून निवृत्त असल्याचे सांगून विश्वास संपादन केला. त्यांनी फोरेक्स ट्रेडिंगमधून मोठा परतावा मिळतो, असे सांगून त्यांच्याच ओळखीतील दीपक यादव यांच्याशी काळेंची भेट घडवून आणली.

Advertisement

दीपक यादव यांनीही स्वतःला माजी आर्मी अधिकारी असल्याचे सांगत महिन्याला ४ टक्के म्हणजेच वर्षाला ४८ टक्के परतावा मिळेल, असे आमिष दाखवले. यामुळे विश्वासाने माधव काळे यांनी स्वतः सह पत्नी, मुलगा व नातेवाईक सई बोरकर यांच्या खात्यांतून मिळून १.१० कोटी रुपयांची गुंतवणूक दीपक यादव यांच्या खात्यात ट्रान्सफर केली.

  • परतावा दिला पण काहीच महिने

प्रारंभी काही महिन्यांत केवळ ८ लाख रुपयांचा परतावा देण्यात आला. त्यानंतर मात्र पैसे देणे बंद झाले. नोटरी करून देतो, असे सांगून वेळकाढूपणा करण्यात आला. सततच्या मागणीनंतर दीपक यादव यांनी सैदापूर (सातारा) येथील 'मॅजेस्टिक व्हिला' मधील दोन बंगल्यांची विक्री करून पैसे परत देतो, असे सांगितले. पण प्रत्यक्षात कोणतीही कारवाई झाली नाही. फसवणुकीची खात्री झाल्यानंतर काळे यांनी चौकशी केली असता संदेश आनंदराव चव्हाण (रा. मुंढे, ता. कराड) यांची ४ लाख आणि राजेंद्र ज्ञानदेव पिसाळ (रा. करवडी, ता. कराड) यांची १.९० लाख रुपयांची अशीच फसवणूक झाल्याचे उघड झाले. याशिवाय इतर अनेक गुंतवणूकदारही या फसवणूक रॅकेटचे बळी ठरल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. माधव काळे यांच्या तक्रारीनंतर कराड शहर पोलिसांनी दीपक यादव व किशोर पिसाळ यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार पूर्वनियोजित गुंतवणूक फसवणूक रॅकेट असल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. पुढील तपास सुरू असून, इतर फसवणूकग्रस्तांनीही पुढे येण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Advertisement
Tags :

.