महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

जिल्हा पंचायतीत नोकरी देण्याचे सांगून फसवणूक

11:09 AM Aug 09, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

बनावट कागदपत्रेही केली तयार : तिघा जणांविरुद्ध एफआयआर

Advertisement

प्रतिनिधी/बेळगाव

Advertisement

जिल्हा पंचायत कार्यालयात कंत्राटी पद्धतीने कॉम्प्युटर ऑपरेटर पदावर नियुक्ती केल्याचे सांगून अथणी तालुक्यातील दोघा जणांची फसवणूक करण्यात आली आहे. यासंबंधी तिघा जणांविरुद्ध मार्केट पोलीस स्थानकात एफआयआर दाखल करण्यात आले असून फसवणुकीसाठी जिल्हा पंचायतीच्या नावे बनावट कागदपत्रे, लेटर हेड तयार करण्यात आल्याचे उघडकीस आले आहे. बेळगाव जिल्हा पंचायतीचे प्रशासकीय विभागाचे साहाय्यक सचिव राहुल आण्णाप्पा कांबळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुरुवारी मार्केट पोलीस स्थानकात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक महांतेश द्यामण्णावर, उपनिरीक्षक विठ्ठल हावण्णावर आदी अधिकारी याप्रकरणी पुढील तपास करीत आहेत. फसवणुकीच्या या प्रकाराने एकच खळबळ माजली आहे. खरे तर जिल्हा पंचायत कार्यालयात नोकर भरती किंवा प्रशिक्षणासाठी कोणतेच आदेश काढण्यात आले नाहीत. असे असताना नंदेश्वर (ता. अथणी) येथील कविता मादर व सिद्धलिंग तळवार या दोघा जणांशी संपर्क साधून कंत्राटी पद्धतीने नियुक्ती केल्याचे सांगून त्यांची फसवणूक करण्यात आली आहे.

8 मे 2024 रोजी जिल्हा पंचायतीच्या नावे बनावट ई-मेल अकाऊंट उघडून त्या अकाऊंटवरून कविता यांना नियुक्तीपत्र पाठविण्यात आले आहे. निवासाची व्यवस्था करण्यासाठी फोन पे च्या माध्यमातून त्यांच्याकडून 9 हजार रुपये जमा करून घेण्यात आले. तर सिद्धलिंग तळवार यांची नियुक्ती करण्याचे सांगून बनावट ओळखपत्र, पे स्लिप, जिल्हा पंचायतीच्या नावे बनावट चेक तयार करून ते सिद्धलिंग यांना पाठविण्यात आले आहेत. निवासाची व्यवस्था करण्यासाठी त्यांच्याकडूनही फोन पे च्या माध्यमातून 11 हजार रुपये जमा करून घेण्यात आले आहेत. नोकर भरतीसंबंधी फोनवरून चर्चा करताना या भामट्यांनी आपले नाव रमेश व कार्तिक असल्याचे सांगितले होते. जिल्हा पंचायतीच्या नावे बनावट कागदपत्रे तयार करून कंत्राटी पद्धतीने नोकर भरती करण्याचे सांगून फसवणूक करणाऱ्या तिघांची माहिती मिळविण्यात येत आहे. कारण त्यांच्या मोबाईल क्रमांक व्यतिरिक्त फसवणूक झालेल्या दोघा जणांकडे कोणतीच माहिती नाही. त्यामुळे मोबाईल क्रमांकावरून त्यांचा शोध घेण्यात येत आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article