महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

फ्रान्सिस सार्दिन यांचा प्रचार सुरू

11:43 AM Dec 26, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

कुडतरीतील निवासस्थानी जमलेल्या लोकांसमोर मांडली शेवटच्या खेपेला लोकसभा निवडणूक लढविण्याची इच्छा

Advertisement

मडगाव : काँग्रेस श्रेष्ठींनी दक्षिण गोवा लोकसभा मतदारसंघातील तिकिटाचे दावेदार व काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांचा उत्तर भारतातील चार राज्यांचे प्रभारी म्हणून नियुक्ती केली असतानाही दक्षिण गोव्यातील काँग्रेसचे खासदार फ्रान्सिस्को सार्दिन यांनी 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठीचा प्रचार सुरू केला आहे. चार वेळा खासदार बनलेल्या सार्दिन यांनी आपल्या चार दशकांच्या राजकीय कारकिर्दीत शेवटच्या वेळी लोकसभेवर पुन्हा निवडून येण्याची इच्छा रविवारी जाहीरपणे व्यक्त केली. आपल्या कुडतरी येथील निवासस्थानी जमलेल्या लोकांना त्यांनी आपण आगामी निवडणूक लढावी अशी इच्छा असल्यास हात वर करावेत असेही सांगितले. टाळ्यांचा कडकडाट होताच सार्दिन यांनी पक्षाने त्यांना या जागेवर उमेदवारी दिल्यास आगामी निवडणुकीत आपले सर्व समर्थक समर्थन करतील अशी अपेक्षा व्यक्त केली. त्यांच्या एका समर्थकाने यावेळी सार्दिन हेच एकमेव असे नेते आहेत की, जे जात, पंथ आणि धर्माचा विचार न करता सर्व लोकांना मान्य आहेत, असा दावा केला. ‘तुम्ही मला दक्षिण गोव्यातून तब्बल चार वेळा पाठिंबा देऊन निवडून दिले आहे. यावेळी पक्षाने तिकीट दिल्यास मी शेवटच्या खेपेला निवडणूक लढवण्यास तयार आहे. मला तुमचा पाठिंबा हवा आहे’, असे सार्दिन म्हणाले.

Advertisement

गिरीश चोडणकर, कॅप्टन विरिएटो फर्नांडिस व एल्विस गोम्स या तीन काँग्रेस नेत्यांनी दक्षिण गोव्याची लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा उघड केली आहे हे जाणून सार्दिन म्हणाले, ‘मी असे म्हणत नाही की, इतरांना संधी मिळू नये. परंतु इतरही काही घटक आहेत ज्यांचा विचार करणे आवश्यक आहे. मागील निवडणुकांप्रमाणे तुम्ही सर्वांनी मला पाठिंबा द्यावा अशी अपेक्षा आहे. मला सर्व काही माहीत आहे असे मी म्हणत नाही. म्हणून मी नेहमीच लोकांशी संपर्क साधलेला आहे आणि गोमंतकीयांना बाधणारे मुद्दे संसदेत मांडण्यासाठी त्यांनी मला मार्गदर्शन केलेले आहे’. गोव्याचे प्रश्न संसदेत मांडण्यात आपण कधीही अपयशी ठरलेलो नाही, असे सांगून सार्दिन यांनी, लॉटरी पद्धतीनुसार खासदारांना लोकसभेत बोलण्याची संधी मिळते, याकडे लक्ष वेधले. पोर्तुगालमध्ये जन्म नोंदवलेल्या गोमंतकीयांचे भारतीय पासपोर्ट रद्द करण्याचा मुद्दा आपण गृहमंत्री तसेच परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांकडे उपस्थित केला आहे. या मुद्यावर आपण परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांच्या उत्तराची वाट पाहत आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. निवडणुकीत ज्यांनी आपल्याला मतदान केले त्यांना माहीत आहे की, आपण गोव्यातील लोकांसाठी काय केले आहे आणि आपण काय करू शकतो, असे सांगून भाजप सरकारचा त्यांनी खरपूस समाचार घेतला.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article