फ्रान्सचा मुलेर अजिंक्य
06:09 AM Jan 06, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
Advertisement
रविवारी झालेल्या एटीपी टूरवरील हाँगकाँग खुल्या पुरुषांच्या टेनिस स्पर्धेत फ्रान्सच्या अॅलेक्सांडर मुलेरने एकेरीचे जेतेपद पटकाविताना जपानच्या निशीकोरीचा पराभव केला.
पुरुष एकेरीच्या अंतिम सामन्यात मुलेरने निशीकोरीच 2-6, 6-1, 6-3 असा पराभव केला. हा सामना सुमारे 100 मिनिटे चालला होता. जपानच्या 35 वर्षीय निशीकोरीने आपल्या वेगवान सर्व्हिसच्या जोरावर पहिला सेट 6-2 असा केवळ 33 मिनिटात जिंकला. पण त्यानंतर मुलेरने दर्जेदार खेळ करत सलग पुढील दोन सेटस् जिंकून निशीकोरीचे आव्हान संपुष्टात आणले. एटीपी टूरवरील मुलेरचे हे पहिले विजेतेपद आहे.
Advertisement
Advertisement