फ्रान्सच्या डेम्बेलेला बॅलन डी’ओर पुरस्कार
वृत्तसंस्था/ पॅरिस
= बॅलन डी’ओर पुरस्कार जिंकला. दुसरीकडे, बार्सिलोनाच्या आयताना बोनमॅटीने सलग तिसऱ्या वर्षी महिलांचा किताब जिंकून इतिहास रचला.
ब्राझिलियन दिग्गज रोनाल्डिन्हो व्यासपीठावर असताना आणि प्रतिष्ठित किताबाच्या विजेत्याची घोषणा करण्याच्या उंबरठ्यावर असताना थिएटर उजळून निघाले आणि डेम्बेलेच्या जयघोषाने गुंजले. परिस्थिती तणावपूर्ण बनत असताना यमालचाही काही प्रमाणात जयघोष झाला. परंतु शेवटी फ्रेंच खेळाडूने त्याच्या कारकिर्दीत पहिल्यांदाच हा सर्वोच्च सन्मान मिळवला.
प्रेक्षकांनी त्याच्या नावाची घोषणा झाल्यानंतर असा आनंदोत्सव साजरा केला की, त्याला भाषण देण्यासाठी त्यांना शांत राहण्यास सांगावे लागले. डेम्बेले हा पीएसजीच्या आक्रमक संघातील एक चमकणारा खेळाडू असून त्याने 53 सामन्यांमध्ये 35 गोल केले आहेत आणि 16 गोलांच्या बाबतीत साहाय्य केलेले आहे. पुरस्कार स्वीकारल्यानंतर समारंभास उपस्थित असलेल्या आपल्या आईबद्दल बोलताना तो भावूक झाला. पुऊषांच्या गटात एफसी बार्सिलोनाकडून खेळताना सलग दुसऱ्या वर्षी उत्कृष्ट हंगामाचा आनंद घेतलेल्या यमालने कोपा ट्रॉफी कायम ठेवली.
महिला गटात बार्सिलोनासोबतचा उत्कृष्ट हंगाम अनुभवलेली बोनमॅटी सलग तिसऱ्यांदा हा पुरस्कार जिंकण्यात यशस्वी ठरली. तिने अनुक्रमे स्पेन आणि बार्सिलोनातर्फे युरो आणि चॅम्पियन्स लीगच्या अंतिम फेरीत धडक मारली, परंतु दोन्ही वेळा तिला निराशा सहन करावी लागली आणि रिकाम्या हाताने परतावे लागले. सलग तीन वेळा गोल्डन बॉल जिंकणारी ती पहिली महिला खेळाडू आहे आणि या उल्लेखनीय कामगिरीनिशी ती फुटबॉल आयकॉन लिओनेल मेस्सी आणि मिशेल प्लॅटिनी यांच्या गटात सामील झाली आहे.