For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सीरियाच्या अध्यक्षांविरोधात फ्रान्सकडून अटक वॉरंट

07:00 AM Nov 17, 2023 IST | Tarun Bharat Portal
सीरियाच्या अध्यक्षांविरोधात फ्रान्सकडून अटक वॉरंट
Advertisement

पॅरिस : सीरियाचे अध्यक्ष बशर अल-असाद विरोधात फ्रान्समध्ये आंतरराष्ट्रीय अटक वॉरंट जारी करण्यात आले आहे. सीरियात नागरिकांच्या विरोधात प्रतिबंधित रासायनिक अस्त्रांचा वापर असाद यांनी केला असल्याचा आरोप फ्रान्सने केला आहे. दोन न्यायाधीशांनी युद्धगुन्ह्यांमधील सहभागासाठी बशर अल-असाद, त्यांचे बंधू माहेर अल-असाद समवेत दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी केले आहे. हा निर्णय अभूतपूर्व असल्याचे सीरियन सेंटर फॉर लीगल स्टडीज अँड रिसर्चचे संस्थापक अन्वर अल-बुन्नी यांनी म्हटले आहे. पहिल्यांदाच एखाद्या देशाने अन्य देशाच्या प्रमुखांच्या विरोधात मानवतेशी निगडित गुन्ह्यांसाठी अटक वॉरंट जारी केल्याचे बोलले जात आहे. याप्रकरणी इंटरपोलकडून रेड नोटीस जारी केली जाऊ शकते. इंटरपोलची रेड नोटीस जगभरातील कायदा अंमलबजावणी यंत्रणांकडून प्रत्यार्पण, आत्मसमर्पण किंवा अशाच प्रकारच्या कायदेशीर कारवाईसाठी प्रलंबित आरोपीचा शोध घेणे आणि त्याला अस्थायी स्वरुपात अटक करण्यासाठी बजावण्यात येते. सीरियन सरकारवर दमास्कसमधील उपनगर घोउटामध्ये विषारी वायूचा वापर करण्याचा आरोप झाला होता.

Advertisement

Advertisement
Tags :

.