फ्रान्स नंबरप्लेटचा जनक
सद्यकाळात वाहनांवर नंबरप्लेट असणे सामान्य बाब आहे. नंबरप्लेटद्वारे वाहनाचा मालक कोण, ती कुठल्या भागात खरेदी करण्यात आली हे समजते. वाहनांवर नंबरप्लेट लावण्याची सुरवात 19 व्या शतकाच्या अखेरीस झाली होती. वाढत्या वाहनांच्या संख्येसोबत रस्त्यांवर वाहतुकीचा दबावही वाढत होता. याचबरोबर दुर्घटनांचे प्रमाण वाढत होते, अशा स्थितीत वाहनांची ओळख पटविण्यासाठी एक व्यवस्थित पद्धत शोधणे आवश्यक ठरले होते.
सर्वप्रथम वाहनांवर नंबरप्लेट लावण्याचे श्रेय फ्रान्सला जाते. 1893 मध्ये फ्रान्समध्ये मोटर वाहनांसाठी पहिल्यांदा नंबरप्लेट अनिवार्य करण्यात आली होती. या नंबरप्लेट्स वाहनाचा नोंदणी क्रमांक होता, ज्यामुळे पोलीस आणि अन्य अधिकारी वाहनाची ओळख पटवू शकत होते.
फ्रान्सनंतर अन्य युरोपीय देशांमध्ये देखील वाहनांवर नंबरप्लेट लावण्याची पद्धत रुढ झाली. ब्रिटनमये 1903 तर जर्मनीत 1906 मध्ये नंबरप्लेट्स अनिवार्य करण्यात आल्या. अमेरिकेतही 20 व्या शतकाच्या प्रारंभी अनेक प्रांतांनी वाहनांवर नंबरप्लेट लावण्याचा कायदा लागू केला.
भारतात वाहनांवर नंबरप्लेट लावण्याची सुरुवात 1947 मध्ये स्वातंत्र्यानंतर झाली. भारतात नंबरप्लेट्सवर वाहनाचा नोंदणी क्रमांक, राज्याचा कोड आणि वाहनाचा प्रकार नमूद असतो.
नंबरप्लेटचे महत्त्व
ओळख : नंबर प्लेटसद्वारे वाहनांची ओळख सहजपणे पटविली जाऊ शकते, यामुळे दुर्घटनांप्रकरणी दोषीला शोधून काढणे सोपे ठरते.
करसंग्रह : नंबर प्लेटसद्वारे वाहन मालकांकडून कर वसूल केला जाऊ शकतो.
वाहतूक नियंत्रण : शिस्त मोडणाऱ्या वाहनांवर कारवाई करत वाहतूक नियंत्रित करणे सोपे ठरले.
गुन्हे नियंत्रण : चोरलेल्या वाहनांना शोधण्यास नंबरप्लेटस अत्यंत उपयुक्त ठरत असतात.