फ्रान्सने कमी केली राफेलची किंमत
भारताला होणार लाभ : एनएसए अजित डोवाल फ्रान्सच्या दौऱ्यावर जाणार
वृत्तसंस्था/ पॅरिस
भारत आणि फ्रान्स हे भारतीय विमानवाहू युद्धनौकांसाठी आवश्यक राफेलमरीन लढाऊ विमानांसाठी एका करारावर लवकरच स्वाक्षरी करणार आहेत. याकरता दोन्ही देश या व्यवहाराकरता मूल्य निश्चितीच्या प्रक्रियेत आहेत. संरक्षण मंत्रालयांदरम्यान अनेक फेऱ्यांमधील चर्चेनंतर व्यवहाराच्या अंतिम मूल्यात मोठी घट झाली असून कराराला 2016 च्या करारावर बेंचमार्क करण्यात येणार आहे. यात वायुदलासाठी 36 राफेल लढाऊ विमानांची खरेदी करण्यात आली होती.
तीन वर्षांपेक्षा अधिक काळापासून सुरू असलेले अधिग्रहण चालू आठवड्यात राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्या पॅरिस दौऱ्यादरम्यान चर्चेच्या केंद्रस्थानी असणार आहे. नौदलासाठी लढाऊ विमानांच्या अधिग्रहणासोबत मुंबईत निर्माण होणाऱ्या तीन अतिरिक्त कल्वरी श्रेणीच्या पाणबुड्यांची ऑर्डर फ्रान्ससोबत होणाऱ्या दोन प्रमुख संरक्षण करारांमध्ये सामील असणार आहे.
26 लढाऊ विमानांची होणार खरेदी
नौदलाला 26 लढाऊ विमानांची आवश्यकता आहे. ही लढाऊ विमाने विमानवाहू युद्धनौकांवर तैनात केली जाणार आहेत. नौदलाने बोइंग एफ/ए 18 सुपर हॉर्नेट आणि राफेल एम दोन्हींचे परीक्षण केले आहे. परंतु परीक्षणानंतर तांत्रिक आधारावर नौदलाने राफेल एम या लढाऊ विमानांची निवड केली आहे.
भारत अन् फ्रान्सदरम्यान चर्चा
एक वर्षापेक्षा अधिक काळापासून भारत आणि फ्रान्स याहंच्यात करारावर शिक्कामोर्तब करण्यासाठी चर्चा सुरू आहे. हा करार दोन्ही देशांच्या सरकारांचे मापदंड आणि नियमांनुसार तयार केला जात आहे. वायुदलासाठी राफेल लढाऊ विमाने खरेदी करताना देखील हीच प्रक्रिया अवलंबिण्यात आली होती.
राफेल एमची वैशिष्ट्यो
भारतील नौदलाला प्राप्त होणारी लढाऊ विमाने अँटी-शिप शस्त्रास्त्रs आणि समुद्रातील मोहिमांसाठी दीर्घ अंतराच्या इंधन टँक्सनी युक्त असणार आहेत. या लढाऊ विमानांसोबत मेट्योर एअर-टू-एअर क्षेपणास्त्रs मिळणार आहेत. ही क्षेपणास्त्रs या क्षेत्रात आतापर्यंतची सर्वात आधुनिक ठरणार आहेत. आयएनएस विक्रांत आणि आयएनएस विक्रमादित्य या भारतीय विमानवाहू युद्धनौकांवर या लढाऊ विमानांना तैनात केले जाणार आहे.
काही दुरुस्त्यांना मंजुरी
यापूर्वी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या नेतृत्वाखालील संरक्षण अधिग्रहण परिषदेने काही सुधारणांना मंजुरी दिली होती. ज्यामुळे अंतिम बोली सादर करण्यात आली. यातील एक नौदलाच्या लढाऊ विमानावर भारतीय रडार आणि शस्त्रास्त्रs एकीकृत करण्याच्या पूर्वीच्या योजनेला त्यागणे होते. रडारला बदलण्यासाठीचा उच्च खर्च आणि अधिक आवश्यक स्वरुपात एकीकरण पूर्ण करण्यासाठी अनुमानित 8 वर्षांपेक्षा अधिकच्या कालमर्यादेमुळे योजनांचा विचार सोडून देण्यात आला.
डोवाल करणार चर्चा
राफेल एम विषयी भारत-फ्रान्स रणनीतिक चर्चेदरम्यान वाटाघाटी होणार आहेत. भारताचे एनएसए डोवाल हे फ्रेंच एनएसएसोबत चर्चा करणार आहेत. हा व्यवहार भारतीय नौदलासाठी महत्त्वपूर्ण आहे, कारण भारत स्वत:ची सागरी लढाऊ क्षमता मजबूत करण्यासाठी प्रयत्नशील आहे. चीन आणि पाकिस्तानकडून निर्माण झालेले आव्हान पाहता भारतीय नौदल स्वत:च्या सामर्थ्यात भर घालण्याच्या योजनेवर काम करत आहे. मागील काही काळात चीनच्या हिंदी महासागरातील हालचाली वाढल्या आहेत. हिंदी महासागरावरील स्वत:चे प्रभुत्व कायम ठेवण्यासाठी भारतीय नौदलाला राफेल एम या लढाऊ विमानांमुळे मोठी मदत होणार आहे.