For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

फ्रान्सचा इजिप्तवर 3-1 ने विजय

06:47 AM Aug 07, 2024 IST | Tarun Bharat Portal
फ्रान्सचा इजिप्तवर 3 1 ने विजय
Advertisement

वृत्तसंस्था/ ल्योन

Advertisement

पॅरिस ऑलिम्पिकमधील पुऊषांच्या फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पाऊल ठेवताना यजमान फ्रान्सने स्टेड डी लियॉन येथे झालेल्या उपांत्य फेरीच्या लढतीत इजिप्तला 3-1 ने पराभूत केले. यामुळे अंतिम फेरीत आता फ्रान्स विऊद्ध स्पेन असा मुकाबला होणार असून त्यामुळे 32 वर्षांनंतर पहिल्यांदाच ऑलिम्पिकमध्ये युरोपियन सुवर्णपदक विजेता दिसेल.

महमूद साबेरने 62 व्या मिनिटाला झालेल्या केलेल्या गोलच्या जोरावर इजिप्तने आघाडी घेतल्यानंतर यजमान देशाचे अंतिम फेरीतील स्थान गंभीर संशयाच्या भोवऱ्यात सापडले होते. पण 83 व्या मिनिटाला मॅटेटाने बरोबरी साधून सामना अतिरिक्त वेळेत नेला. त्यानंतर त्याचा दुसरा गोल 99 व्या मिनिटाला झाला आणि मायकेल ऑलिसेने 108 व्या मिनिटाला त्यात फ्रान्सच्या तिसऱ्या गोलाची भर टाकली.

Advertisement

मागील पाच स्पर्धांमध्ये ब्राझील आणि अर्जेंटिना (प्रत्येकी दोन) आणि मेक्सिको यांची सरशी झाली होती. या निकालांमुळे लॅटिन अमेरिकन राष्ट्रांचे वर्चस्व देखील संपुष्टात आले आहे. फ्रान्सला फुटबॉलमधील एकमेव ऑलिम्पिक सुवर्ण 1984 मध्ये लॉस एंजलिस येथे प्राप्त झाले होते.

Advertisement
Tags :

.