For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

फ्रान्सची बेल्जियमवर 1-0 ने मात

06:36 AM Jul 03, 2024 IST | Tarun Bharat Portal
फ्रान्सची बेल्जियमवर 1 0 ने मात
Advertisement

वृत्तसंस्था/ ड्युसेलडॉर्फ (जर्मनी)

Advertisement

युरोपियन चॅम्पियनशिपमध्ये फ्रान्सची आणखी एक चांगली कामगिरी घडून त्यांनी बेल्जियमला 1-0 ने पराभूत करून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. मात्र त्यांचा स्टार खेळाडू किलियन एमबाप्पेसाठी हा आणखी एक निराशाजनक सामना राहिला. जगात दुसऱ्या क्रमांकावर असलेला फ्रान्स आणि तिसऱ्या क्रमांकावर असलेला बेल्जियम यांच्यातील हा हेविवेट सामना अपेक्षांना जगू शकला नाही आणि एकमेव गोलावरून ते सिद्ध होते.

रँडल कोलो मुआनी या दुसऱ्या सत्रामध्ये उतरलेल्या बदली खेळाडूने 85 व्या मिनिटाला हाणलेला फटका बेल्जियमचा बचावपटू जॅन व्हर्टोन्घेन याला आदळून अडकलेला गोलरक्षक कोएन कॅस्टिल्सच्या वरून गेला. ‘या सामन्यात जरी हा एकमेव गोल आम्हाला उपांत्यपूर्व फेरीत पोहोचविण्यास पुरेसा ठरला असला, तरी आमच्याकडे अधिक गोल करण्याची क्षमता आहे’, असे फ्रान्सचे प्रशिक्षक देशाँ यांनी नंतर सांगितले.

Advertisement

फ्रान्सच्या सलामीच्या सामन्यात ऑस्ट्रियाविऊद्ध दुखापत झालेल्या नाकाचे रक्षण करण्यासाठी पुन्हा मास्क घालून खेळलेल्या एमबाप्पेने फ्रान्सचे 20 पैकी पाच फटके हाणले, पण एकही लक्ष्याच्या दिशेने अचूक राहिला नाही. तो मुख्यत: डाव्या बाजूने खेळला आणि बेल्जियन बचावफळीने त्याच्यावर चांगल्या प्रकारे नजर ठेवली. यात केविन डी ब्रुयन या संघाच्या सर्वांत सर्जनशील खेळाडूचाही समावेश होता. या सामन्याचा नायक शेवटी कोलो मुआनी ठरला. मुआनीनेच अर्जेंटिनाविऊद्धच्या 2022 च्या विश्वचषक फायनलमध्ये अतिरिक्त वेळेच्या शेवटच्या सेकंदांत गोल करण्याचा प्रयत्न केला होता. पण त्याचा फटका एमी मार्टिनेझने अडविला होता. तो गोल झाल्यास फ्रान्सला जेतेपद निश्चितच मिळाले असते.

Advertisement
Tags :

.