कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

फ्रान्सकडून नव्या वायुतळाची घोषणा

06:21 AM Mar 20, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

हायपरसोनिक क्षेपणास्त्रांनी युक्त 40 सुपर राफेल लढाऊ विमाने तैनात

Advertisement

वृत्तसंस्था / पॅरिस

Advertisement

अमेरिकेने युरोपच्या रक्षणाच्या जबाबदारीतून काढता पाय घेतल्यावर फ्रान्सने आता पुढाकार घेतला आहे. फ्रान्स आता आणखी एक आण्विक हल्ला करण्यास सक्षम वायुतळ निर्माण करणार आहे. या वायुतळावर 40 नवी राफेल लढाऊ विमाने तैनात केली जाणार आहेत, जी अत्याधुनिक एफ5 च्या तोडीची असतील. याचबरोबर या राफेल विमानांना हायपरसोनिक क्षेपणास्त्रांनी सज्ज केले जाणार आहे. डोनाल्ड ट्रम्प हे नाटो देशांच्या सुरक्षेपासून दूर हटत आहेत तर रशियाच्या आण्विक हल्ल्याच्या भीतीच्या छायेत युरोपीय देश आहेत. याच कारणामुळे आता युरोपीय देश अमेरिकेवरील अवलंबित्व कमी करत स्वत:ची आण्विक प्रत्युत्तर क्षमता मजबूत करू पाहत आहेत.

फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी नव्या आण्विक वायुतळाची घोषणा केली आहे. 2035 पर्यंत एएसएन4जी नवे हायपरसोनिक क्षेपणास्त्रही तयार केले जाणार आहे. नव्या वायुतळासाठी 1.6 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक केली जाणार आहे. युक्रेन युद्धामुळे जागतिक स्थिती बदलली आहे. फ्रान्स 2032 मध्ये या वायुतळावर राफेल लढाऊ विमानांची पहिली स्क्वाड्रन तैनात करणार आहे. तर दुसरी स्क्वाड्रन 2036 पर्यंत तैनात होईल, असे संबंधित क्षेत्राचे सिनेटर सेड्रिक पेरिन यांनी सांगितले आहे.

फ्रान्सने यापूर्वी 42 अतिरिक्त राफेल लढाऊ विमानांची ऑर्डर दिली होती. ही सर्व विमाने एएसएन4जी हायपरसोनिक क्षेपणास्त्रs डागण्यास सक्षम असतील आणि लॉयल विंगमॅनप्रमाणे ड्रोनसोबत मिळून शत्रूवर हल्ला करण्यास सक्षम असणार आहेत. फ्रान्सचा नवा आण्विक हल्ला करण्यास सक्षम वायुतळ निर्माण करण्याचा निर्णय फ्रेंच वायुदल आणि स्पेस फोर्ससाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. सध्या फ्रान्सच्या तीन वायुतळांवर अणुबॉम्ब ठेवण्यात आले असून यात सेंट डिजिएर, इस्तरेस आणि अवोर्ड या तळांचा समावेश आहे. या वायुतळांवर एकूण 50 राफेल विमाने तैनात आहेत. या राफेल लढाऊ विमानांमध्ये एएसएमपी-ए सुपरसोनिक क्षेपणास्त्र जोडण्यात आले आहे. तसेच त्यांच्या मदतीसाठी एअरबस ए330 एमआरटीटी एअर ऑइल टँकर देखील तैनात आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article