टोप दक्षिणवाडीत विहिरीत पडलेल्या कोल्ह्याला वन्यजीव पथकाने दिले जीवदान
टोप /वार्ताहर
टोप दक्षिणवाडी येथील उदय गायकवाड यांच्या मळ्यातील विहीरीत गेल्या चार दिवसापासून कोल्हा पडला होता.त्या कोल्हयाला वनविभागाच्या वन्यजीव बचाव पथकच्या व शेतकऱ्याच्या अथक प्रयत्नांने जीवदान मिळाले.
गेल्या चार दिवसापासून दक्षिणवाडीतील उदय गायकवाड यांच्या मळ्यातील शेतात असलेल्या विहीरीत कोल्हा असल्याचे दिसले.पण उदय गायकवाड यांनी तेथील शेतकरी गणपती पाटील यांच्या सहकार्याने त्या कोल्हयाला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला पण विहिरीतील झुडपात पुन्हा कोल्हा जाऊन बसला तोही अयशस्वी ठरला त्या नंतर उदय गायकवाड यांनी वनविभागाशी संपर्क केला. त्यानुसार वनविभागाने वन्यजीव पथकाला पाठवून देवून त्या पथकाने विहीरीतील कोल्हया ला बाहेर काढण्यासाठी विहिरीत पिंजरा सोडला त्या पिंजऱ्यात तो कोल्हा गेल्याने त्याला जीवदान मिळाले. त्या कोल्हया ला वनविभागाच्या वन्यजीव पथकाने नैसर्गिक अधिवासात सोडले.
वनविभागाचे अमोल चव्हाण,मतीन बागी, विनायक माळी, प्रदीप सुतार, ओकार काटकर या वन्यजीव पथकाबरोबर उदय गायकवाड,गणपती पाटील व अन्य शेतकरी यांनी सहभाग घेत कोल्ह्याला जीवदान दिले.