महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

ईडीकडून चौथा समन्स, तरीही केजरीवाल गैरहजर

07:00 AM Jan 19, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे चौथ्या समन्सनंतरही ईडीसमोर हजर राहिलेले नाहीत. ईडीचा उद्देश अटक करणे असल्याचे केजरीवाल यांनी स्वत:च्या उत्तरात नमूद केले आहे. दोन वर्षांपासून तपास सुरु आहे. मग अशा स्थितीत लोकसभा निवडणुकीपूर्वी चौकशीसाठी नोटीस का पाठविण्यात आली असा प्रश्न उपस्थित करत केजरीवाल यांनी भाजपकडून ईडी संचालित होत असल्याचा आरोप केला आहे. केजरीवाल यांना निवडणुकीत प्रचार करण्यापासून रोखण्याचा ईडीचा प्रयत्न आहे. ईडीने आरोपपत्रात केजरीवाल आरोपी नसल्याचे नमूद केले आहे, मग त्यांना समन्स का बजावला जात आहे, ईडीने केजरीवाल यांच्या अटकेची तयारी का केली अशी विचारणा आम आदमी पक्षाकडून करण्यात आली आहे.

Advertisement

Advertisement
Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article