For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Sangli News: सांगलीतील 'या' लेझीम पथकाची ६४ वर्षांची अखंड परंपरा

06:07 PM Jul 25, 2025 IST | Tarun Bharat Portal
sangli news  सांगलीतील  या  लेझीम पथकाची ६४ वर्षांची अखंड परंपरा
Advertisement

        लेझीम प्रकार आजही त्याच जोशात व उत्साहात गेली ६४ वर्ष या मंडळाने सांभाळला

Advertisement

सांगली:  मुळ सहा गल्ल्यांच्या सांगलीतील १९६१ पासूनचे हे संग्राम लेझीम पथक. ६४ वर्षांची अखंड परंपरा जपत सध्या चौथी पिढी सराव करत आहे. आपल्या भागातील घाटी लेझीम हा लेझीम प्रकार आजही त्याच जोशात व उत्साहात गेली ६४ वर्ष या मंडळाने सांभाळला आहे.

सन १९६१ साली राणाप्रताप या नावाने मोहन गाडेकर, बसंत बावडेकर, लक्ष्मण चव्हाण यांनी स्थापन केलेले लेझीम पथक १९७१ साली संग्राम लेझीम पथक या नावाने सुरु झाले. शिवकालीन मर्दानी खेळ आपल्या तरुणाईला रुजवण्यासाठी व आपली संस्कृती जपण्यासाठी हा खेळप्रकार मंडळात तरुणाईला रुजवण्यासाठी व आपली संस्कृती जपण्यासाठी हा खेळप्रकार करण्यात आला.

यंदाच्या वर्षी ५४ व्या वर्षात पदार्पण करणारे संग्राम मंडळ नेहमीच सामजिक जाणीव जपत आले आहे. मंडळाच्या माध्यमातून गणेशोत्सवात सामाजिक, ऐतिहासिक, पौराणिक, जिवंत, देखावे सातत्याने आजअखेर सुरू आहेत.

Advertisement

सांगलीत आलेल्या २००५, २०१९ व २०२१ च्या महापूरात मंडळाने आपल्या भागातील  सर्व स्वच्छता केली आहे. कोरोना काळातही सामजिक जबाबदारी जपली. मंडळ प्रत्त्येकवर्षी गडकोट स्वच्छता मोहिमेत सहभागी असते. तर मंडळाच्या कार्यकर्त्याकडून अखंडपणे गेली २५ वर्षे श्री रायगडवरील पुजा व सांगली येथील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची पुजा व स्वच्छता सुरु आहे. मंडळाकडून प्रत्येकवर्षी नागपंचमी निमित्त महाप्रसाद आयोजीत केला जातो.

या लेसीम पथकात कोणीही प्रवेश घेऊ शकतो. या खेळाला ना वयाचे बंधन आहे ना कोणत्या जाती धर्माचे बंधन आहे. हि एक उपासना, म्हणून येण्प्रया प्रत्येक खेळाडूला अगदी विनामुल्य प्रशिक्षण दिले जाते. पथकात अगदी ४ वर्षापासून ते ७० वर्षापर्यंतचे सहभागी आहेत.

पथक रोज संध्याकाळी ७.३० वाजल्यापासून १०.३० वाजेपर्यंत वेगवेगळ्या वयोगटात गावभाग सांगली येथे सराव करते. आता हा सराव या भागातील महिलांसाठीही सुरू करण्यात आला आहे. पारंपारिक प्रकारासोबत आता लेझीम स्पर्धेसाठी सुद्धा प्रशिक्षण दिले जाते.

पथकाने गेले दहा वर्षे जिल्ह्यात व जिल्ह्याबाहेर झालेल्या लेझीम स्पर्धेत सर्वात्कृष्ट संघ अशी कामगिरी केली आहे. प्रथम क्रमांकाचा मानकरी संघ नेहमीच राहिला आहे. सोबतच या पथकाने कोलोर, मुंबई, पुणे, सोलापूर, कोल्हापूर, बेळगाव अशा ठिकाणी मोठ्या संस्थांसाठी आपले सादरीकरण केले आहे. 

Advertisement
Tags :

.