महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

मेंदू खाणाऱ्या अमिबाची केरळमध्ये चौथी घटना

06:23 AM Jul 07, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

14 वषीय मुलाला संसर्ग : आतापर्यंत तिघांचा मृत्यू

Advertisement

वृत्तसंस्था/ तिरुअनंतपुरम

Advertisement

केरळमध्ये मेंदू खाणाऱ्या अमिबासंबंधी (ब्र्रेन इटिंग अमिबा) आणखी एक घटना समोर आली आहे. एका 14 वर्षांच्या मुलाला ‘अमीबिक मेनिंगोएन्से फलायटीस’ हा मेंदूतील दुर्मिळ संसर्ग झाल्याचे निदान झाले आहे. या मुलावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. रुग्णालयातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मेंदूच्या संसर्गाने ग्रस्त मुलगा उत्तर केरळ जिह्यातील पयोली येथील रहिवासी आहे. 1 जुलै रोजी त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्यानंतर शनिवारी ‘अमीबिक मेनिंगोएन्से फलायटीस’ संसर्गाची पुष्टी झाली. त्याच्यावर उपचार सुरू असून प्रकृती सातत्याने सुधारत असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांकडून देण्यात आली.

मे महिन्यापासून केरळमध्ये मेंदू खाणाऱ्या अमिबाची चार प्रकरणे आढळून आली आहेत. सर्व रुग्ण मुले आहेत, त्यापैकी तीन आधीच मरण पावले आहेत. मृदुल नामक एका 14 वर्षीय मुलाचा बुधवार, 3 जुलै रोजी संसर्गामुळे मृत्यू झाला होता. त्यापूर्वी 25 जून रोजी कन्नूर येथील एका 13 वषीय मुलीचा मृत्यू झाला होता. तर 21 मे रोजी संसर्गाचा पहिला ऊग्ण आढळला होता. राज्यातील मलप्पुरममध्ये पाच वर्षांच्या मुलीला आपला जीव गमवावा लागला होता. यापूर्वी 2023 आणि 2017 मध्ये राज्याच्या किनारपट्टीवरील अलाप्पुझा जिह्यात हा आजार आढळून आला होता.

‘प्राइमरी अमीबिक मेनिंगोएन्से फलायटिस’ किंवा पीएएम संसर्ग पाण्यात आढळणाऱ्या प्री-लिव्हिंग अमिबामुळे होतो. सदर अमिबा नाकाच्या पातळ त्वचेतून शरीरात प्रवेश करतो, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. ताप, डोकेदुखी, उलट्या आणि चक्कर येणे ही या आजाराची लक्षणे आहेत.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article