Sangli : तानंगमध्ये चारचाकी वाहनाची धडक : पती, पत्नी जखमी
तानंग तासगाव फाट्यावर भीषण अपघात
कुपवाड : तानंगमध्ये तासगाव फाट्यावर मिरजेकडे जाणाऱ्या एका दुचाकीला भरधाव चारचाकी वाहनाची धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीवरील पती, पत्नी जखमी झाले आहेत. ही चारचाकी सुभाषनगर मार्गे तानंगकडे जात होती.
यामध्ये बाजी बाबा ठोंबरे (वय ६१) व पत्नी शिरमाबाई बाजी ठोंबरे (दोघेही रा. काळूबाळू वाडी जुनोनी ता. सांगोला जि. सोलापूर) असे जखमी झालेल्यांची नावे आहेत. याबाबत कुपवाड पोलिसात नोंद झाली असून पोलिसांनी अपघातास कारणीभूत ठरल्याप्रकरणी चारचाकी वाहन चालक शंकर लक्ष्मण रंगोळी (वय ३६,रा. कुडची ता रायबाग जि बेळगावी) याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
सोमवारी दुपारी फिर्यादी बाजी ठोंबरे व त्यांची पत्नी शिरमाबाई हे दोघे दुचाकीवरून (एम एच ४५, ए. वाय. २६३५) तानंग मार्गे मिरजेला जात होते. यावेळी तासगाव फाटा येथेसुभाषनगरहून तानंगकडे भरधाव वेगाने येण्नया चारचाकी (के.ए.२३ पी ९४) वाहन चालक शंकर रंगोळी याने समोरासमोर दुचाकीला जोरदार धडक दिली.
या धडकेत दुचाकीवरील बाजी ठोंबरे व पत्नी शिरमाबाई हे दोघे रस्त्यावर पडल्याने जखमी झाले. जखमी बाजी ठोंबरे यांनी संशयित चालक शंकर रंगोळी विरोधात कुपवाड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी रंगोळी विरोधात गुन्हा दाखल केला आहे.