कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

अळणावरच्या मोटारसायकल चोरट्याकडून पावणे तीन लाखांच्या चार दुचाकी जप्त

12:47 PM Nov 21, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

बेळगाव : एका अट्टल मोटारसायकल चोराला अटक करून त्याच्याजवळून 2 लाख 70 हजार रुपये किमतीच्या चार मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत. हिरेबागेवाडी पोलिसांनी ही कारवाई केली आहे. अजय ऊर्फ अजित बसवराज बजंत्री (वय 19) राहणार अळणावर असे त्याचे नाव आहे. गुरुवारी चोरीच्या मोटारसायकलवरून जाताना संशयावरून पोलिसांनी त्याला अडवून चौकशी केली असता त्याने मोटारसायकल चोरल्याची कबुली दिली आहे. अजय हा व्यवसायाने गवंडी कामगार आहे.

Advertisement

बेळगाव ग्रामीणचे एसीपी बी. एम. गंगाधर यांच्या मार्गदर्शनाखाली हिरेबागेवाडीचे पोलीस निरीक्षक एस. के. होळेण्णावर, उपनिरीक्षक अविनाश ए. वाय., उपनिरीक्षक बी. के. मिटगार, एम. आय. तुरमरी, गुरुसिद्ध पुजारी, एम. जी. माणिकबार, महांतेश कडन्नावर, आर. आर. केळगिनमनी आदींनी ही कारवाई केली आहे. पोलिसांनी अजय ऊर्फ अजितजवळून केए 22 ईके 4078 क्रमांकाची हिरो स्प्लेंडर प्लस, केए 25 ईएम 8053 क्रमांकाची हिरो एचएफ डिलक्स, केए 26 एल 7735 क्रमांकाची बजाज डिस्कव्हर व केए 24 क्यू 5968 क्रमांकाची हिरो स्प्लेंडर प्लस ही वाहने जप्त केली आहेत. त्याने अळणावर, धारवाड येथील नवे बसस्टँड,कित्तूर चन्नम्मा सर्कलजवळून मोटारसायकली चोरल्याची कबुली दिली आहे.

Advertisement

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article