For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

काश्मीरमध्ये 4 दिवसात चार दहशतवादी हल्ले

07:00 AM Jun 14, 2024 IST | Tarun Bharat Portal
काश्मीरमध्ये 4 दिवसात चार दहशतवादी हल्ले
Advertisement

शोध मोहीमेवेळी एका ग्राउंड वर्करला अटक

Advertisement

वृत्तसंस्था /श्रीनगर

जम्मू काश्मीरच्या रियासी, कठुआ आणि दोडामध्ये गेल्या चार दिवसात चार दहशतवादी घटना घडल्या आहेत. पाकपुरस्कृत दहशतवाद्यांकडून सुरू असलेल्या या हल्लासत्रामुळे वातावरण तणावपूर्ण बनले आहे. याचदरम्यान कुपवाडा येथे शब्बीर अहमद नावाच्या ओव्हर ग्राउंड वर्करला अटक करण्यात आली असून तो दहशतवाद्यांना मदत करत असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्याच्याकडून शस्त्रेही जप्त करण्यात आली आहेत. कठुआमध्ये दहशतवाद्यांविरोधात केलेल्या कारवाईनंतर सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात बॉम्ब आणि दारूगोळा जप्त केला आहे. दहशतवाद्यांकडे 30 राउंडची 3 मॅगझिन, 24 राउंडची 1 मॅगझिन, 3 जिवंत ग्रेनेड, 2 लाख ऊपये रोख, पाकिस्तानी बनावटीचे चॉकलेट, हरभरा डाळी, औषधे, इंजेक्शन्स, 1 हँडसेट, 1 एम4 कार्बाइन आणि 1 एके 47 रायफल आदी साहित्य सापडले आहे. सध्या सुरक्षा दलांकडून दहशतवाद्यांच्या शोधार्थ विशेष शोधमोहीम राबवली जात आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.