महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

केरळमध्ये चेंगराचेंगरीत चार विद्यार्थ्यांचा मृत्यू

06:10 AM Nov 26, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

संगीत महोत्सवातील दुर्घटनेत अनेकजण जखमी

Advertisement

वृत्तसंस्था/ कोची

Advertisement

केरळमधील कोची येथील कुसॅट विद्यापीठात शनिवारी एका संगीत कार्यक्रमादरम्यान चेंगराचेंगरी झाली. यामध्ये चार विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला, तर अनेक विद्यार्थी जखमी झाल्याची माहिती आहे. जखमी विद्यार्थ्यांना उपचारासाठी स्थानिक ऊग्णालयात दाखल करण्यात आले आहे. चेंगराचेंगरीच्या घटनेत चार विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाल्याचे केरळच्या आरोग्य मंत्री वीणा जॉर्ज यांनी सांगितले. कुसॅट विद्यापीठात पॅम्पसमधील ओपन एअर-ऑडिटोरियममध्ये आयोजित केलेल्या निखिता गांधी यांच्या मैफिलीदरम्यान चेंगराचेंगरीची दुर्घटना घडली. यामध्ये जखमी झालेल्यांवर कलामसेरी मेडिकल कॉलेजमध्ये उपचाराची व्यवस्था करण्यात आली आहे.

 

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article