कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

शेट्टी गल्ली स्क्रॅप अड्ड्यातील चार मोटारसायकली आगीच्या भक्ष्यस्थानी

12:39 PM Dec 06, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

बेळगाव : शेट्टी गल्ली येथील स्क्रॅप अड्ड्याला अचानक आग लागल्याने या दुर्घटनेत चार मोटारसायकली जळून खाक झाल्या आहेत. शुक्रवार दि. 5 रोजी दुपारी दीडच्या दरम्यान ही घटना घडली असून आगीचे नेमके कारण समजू शकले नाही. अग्निशमन दलाच्या जवानांनी पाण्याचा मारा करून आग आटोक्यात आणली. शेट्टी गल्लीत असलेल्या स्क्रॅप अड्ड्याला दुपारच्या दरम्यान अचानक आग लागली. त्यामुळे स्क्रॅपच्या चार मोटारसायकली आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्या. अचानक लागलेल्या आगीमुळे परिसरातील नागरिकांची धावपळ उडाली. काहींनी ही माहिती अग्निशमन दलाला दिली. काही वेळातच अग्निशमन दलाचे जवान पाण्याच्या बंबासह घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी पाण्याचा मारा करून आग आटोक्यात आणली. कोणीतरी आग लावली असावी, असा संशय व्यक्त केला जात आहे.

Advertisement

Advertisement
Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article