For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

म्हैसूरमध्ये गॅसगळतीमुळे कुटुंबातील चौघांचा मृत्यू

10:25 AM May 23, 2024 IST | Tarun Bharat Portal
म्हैसूरमध्ये गॅसगळतीमुळे कुटुंबातील चौघांचा मृत्यू
Advertisement

झोपलेल्या ठिकाणीच गतप्राण झाल्याने हळहळ

Advertisement

बेंगळूर : गॅसगळती होऊन एकाच कुटुंबातील चौघांचा दुर्दैवी अंत झाल्याची हृदयद्रावक घटना म्हैसूरमधील यरगनहळ्ळी येथे घडली आहे. कुमारस्वामी (वय 45), मंजुळा (वय 39), अर्चना (19), स्वाती (वय 13) अशी मृतांची नावे आहेत. मूळचे चिक्कमंगळूर जिल्ह्यातील कडूर येथील रहिवासी असणारे कुमारस्वामी आणि त्यांचे कुटुंब म्हैसूरमध्ये स्थायिक झाले होते. 19 मे रोजी नातेवाईकांच्या विवाह समारंभासाठी गेलेले हे कुटुंबीय मंगळवारी घरी परतले होते. रात्री झोपी गेल्यानंतर सिलिंडरमधून अचानक झालेल्या गॅसगळतीमुळे झोपेतच चौघांचा मृत्यू झाला. बुधवारी सकाळी घरातून कोणीही बाहेर आले नसल्याने शेजाऱ्यांनी दरवाजा फोडून आत डोकावून पाहिल्यानंतर संपूर्ण कुटुंब झोपेलेल्या ठिकाणीच गतप्राण झाल्याचे आढळले. सिलिंडरचा स्फोट झाला नसल्याने चौघांच्या मृत्युविषयी संशय निर्माण झाला आहे. घटनास्थळी म्हैसूर शहर पोलीस आयुक्त रमेश बानोत व सहकाऱ्यांनी भेट देऊन पाहणी केली. तपासानंतर मृत्यूचे कारण स्पष्ट होणार आहे.

Advertisement
Advertisement
Tags :

.