कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

सोनुर्ली येथे चार फूटी मगर वनविभागाकडून जेरबंद

02:50 PM Oct 19, 2025 IST | अनुजा कुडतरकर
Advertisement

न्हावेली /वार्ताहर

Advertisement

सावंतवाडी तालुक्यातील सोनुर्ली गावामध्ये पुन्हा एकदा मोठी घबराट पसरली आहे.सोनुर्ली पोट्ये कुंभेवाडी येथील शेतकरी नंदू तारी यांच्या शेततळ्यामध्ये सुमारे चार फुट लांबीची मगर वनविभागाने पकडली.अलीकडेच काही दिवसांपूर्वी लगतच असलेल्या वेत्ये गावामध्ये १२ फुट लांबीची मगर पकडण्यात आली होती.ही दुसरी घटना असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.सोनुर्ली पोट्ये कुंभेवाडी भागातील शेतकरी नंदू तारी यांच्या मालकीच्या शेततळ्यात मगर दिसली तातडीने वनविभागाला याची माहिती देण्यात आली.वनविभागाचे जलद कृती दल तात्काळ घटनास्थळी दाखल झाले.जलद कृती दलाचे प्रमुख बबन रेडकर यांच्या नेतृत्वाखालील जवान शुभम कळसुलकर,प्रथमेश गावडे,राकेश अमृसकर,यांनी अंत्यत कुशलतेने आणि काळजीपूर्वक सुमारे चार फूट लांबीच्या मगरीला सुरक्षितपणे पकडल्यानंतर वनविभागाने तिला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आली.काही दिवसांपूर्वीच सोनुर्लीपासून जवळच असलेल्या वेत्ये गावामध्ये कलेश्वर मंदिरालगतच्या ओहोळात सुमारे १२ फूट लांबीची महाकाय मगर पकडण्यात आली होती.त्यानंतर आता सोनुर्ली गावातही मगर सापडल्याने परिसरातील ग्रामस्थांच्या मनात मोठी भीती निर्माण झाली आहे.शेतकरी तसेच लहान मुलांना शेतीत किंवा पाण्याच्या जवळ जाताना अधिक दक्षता घेण्याचे आवाहन वनविभागाने केले आहे.वाढत्या मगर दर्शनाच्या घटनांमुळे या भागात मगरीचा वावर वाढला आहे.का,याबाबत वनविभागाने अधिक लक्ष देण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.

Advertisement

Advertisement
Tags :
#Four-foot crocodile captured by forest department in Sonurli# tarun bharat sindhudurg# news update#konkan update#
Next Article