महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

चार कन्या एकाच दिवशी वाढदिवस !

07:00 AM Oct 06, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

दोन किंवा अधिक महिलांना एकाच दिवशी, एकाच वेळी अपत्ये होणे ही सहज शक्य बाब आहे. कारण जगात प्रतिमिनिट अनेक अर्भके जन्माला येत असतात. अनेक महिलांना एकावेळी दोन किंवा अधिक अपत्येही होतात. त्यांना जुळी किंवा तिळी असे म्हणतात. तथापि, अमेरिकेतील एक महिलेल्या संदर्भात एक वेगळाच प्रकार घडला आहे. या महिलेला चार कन्या आहेत. या चारही मुलींचा वाढदिवस एकाच दिवशी येतो पण त्या जुळ्या किंवा तिळ्या नाहीत. या चारही कन्या प्रत्येक दोन ते तीन वर्षांच्या अंतराने जन्माला आल्या आहेत. या महिलेचे नाव क्रिस्टेन लॅमर्ट असे असून त्या अमेरिकेतील दक्षिण कॅरोलिना प्रांतात पतीसह राहतात.

Advertisement

या दोघांना 9 वर्षांची सोफिया, 6 वर्षांची गुईलिआना, 3 वर्षांची मिया आणि चार आठवड्यांची व्हॅलेंटिना अशा चार कन्या आहेत. या चार कन्यांपैकी कोणीही जुळ्या किंवा तिळ्या नाहीत. तरीही त्या सर्व कन्यांचा जन्म 25 ऑगस्ट या एकाच दिवशी पण वेगवेगळ्या वर्षांमध्ये झालेला आहे. असा प्रकार काही कोटी लोकांमध्ये एखादा आढळतो. जुळी, तिळी किंवा त्यांच्यापेक्षाही जास्त संख्येने अर्भके एकावेळी जन्माला येणे हा प्रकार जितका दुर्मिळ असतो, त्यापेक्षाही जुळी नसलेली पण एकाच दिवशी जन्माला आलेली अपत्ये कमी संख्येने असतात. त्यामुळे लॅमर्ट यांच्या संदर्भात घडलेली ही घटना चर्चेचा विषय बनली आहे. असा प्रकार गर्भाधारणा सुनियोजित पद्धतीने करुनही होऊ शकेल, याची शाश्वती नसते, असे तज्ञांचे मत आहे. मात्र, सध्या या महिलेला यामुळे जोरदार प्रसिद्धी मिळत आहे.
Advertisement

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article