For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

माळेगांवची निवडणूक चौरंगी होणार

05:37 PM Jun 13, 2025 IST | Radhika Patil
माळेगांवची निवडणूक चौरंगी होणार
Advertisement

बारामती / शिवाजीराव ताटे :

Advertisement

माळेगांव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचा बिगुल वाजल्यापासून माळेगावच्या निवडणुकीबाबत चर्चेला उधान आले होते. शेजारील श्री छत्रपती कारखान्याप्रमाणे समझोता होणार ! कि निवडणूक होणार याबाबत तसेच दोन पॅनेल होणार, तीन होणार, कि नार होणार यानी उत्सुकता आज संपली आणि माळेगांवची निवडणूक चौरंगी होणार असल्याचे दुपारी स्पष्ट झाले.

माळेगाव सहकारी साखर कारखान्यांची निवडणूक जाहीर झाल्यानंतर कारखान्याच्या इतिहासात काही गोष्टी अत्यंत आश्चर्यकारक घडल्या. पहिली म्हणजे या कारखान्याच्या २१ जागांसाठी तब्बल ५९३ सभासदांनी उमेदवारीची मागणी केली. दुसरी बाब म्हणजे राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांनी संचालक पदासाठी उमेदवारी साठी अर्ज दाखल केला. तिसरीबाच म्हणजे पहिल्यांदाच हि निवडणूक चौरंगी होत आहे. सताधारी तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा सर्वपक्षीय निलकंठेश्वर पॅनेल यामध्ये नव्या जुन्यांचा मेळ तसेच स्वतः ब वर्गातुन अजित पवार ! दुसरा सहकार बन्नाव शेतकरी पॅनेल गेली ४५ वर्षे माळेगांव कारखान्याच्या सत्तेत चेअरमन व संचालक म्हणून काम केलेले आणि साखर धंद्याची पुरेपूर माहिती असणारे आणि सहकारतज्ञ म्हणून ज्यांना गौरविले जाते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कारखान्याच्या कामकाजाबाबत विरोधी भूमिका बजावणारे चंद्रराव तावरे आणि त्यांचे शिष्य रंजन तावरे यांचा पॅनेल तर तिसरा जेष्ठ नेते माजी केंद्रीय कृषीमंत्री आणि संसदरत्न पुरस्कार विजेत्या खासदार सुप्रिया सुळे व युवानेते युगेंद्र पवार यांचा बळीराजा सहकार बचाव पॅनेल विशेष म्हणजे यामध्ये सर्वसामान्य शेतकरी सभासद अगदी एखादी चारचाकी सुद्धा या कोणाकडेही नाही असे सभासद तर चौथा कटकरी शेतकरी पॅनेल. यामध्येही अत्यंत अभ्यासु आणि कारखान्याच्च्या प्रत्येक चुकीवर बोट ठेवणारांचा हा पॅनेल, अशा पद्धतीने माळेगावची निवडणूक चौरंगी होणार असल्याचे गुरुवारी जाहिर झाले.

Advertisement

उपमुख्यमंत्री अजित पवार निलकंठेश्वर पॅनेलची यादी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष राजवर्धन शिंदे, माळेगांवचे विद्यमान अध्यक्ष केशवराव जगताप व जिल्हा बँकेचे संचालक संभाजी होळकर तसेच खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष अॅड. रविंद्र माने यांनी पत्रकार परिषदेत सकाळी जाहिर केली. त्यामध्ये स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ब वर्गातुन आपला अर्ज कायम ठेवल्याने ही निवडणूक मोठी चुरशीची होणार आहे. उमेदवार यादी गट क्र.१) माळेगाव १) बाळासो पाटील तावरे २) शिवराज जाधवराव ३) राजेंद्र बुरूंगले. गट क्र २) पणदरे १) तानाजी कोकरे, २) स्वप्निल जगताप, ३) योगेश जगताप. गट क्र.३ सांगवी १) विजय तावरे, २) विरेंद्र तावरे, ३) गणपत खलाटे गट क्र.४) खांडज शिरवली १) प्रताप आटोळे, २) सतीश फाळके. गट क्र. ५) निरावागज १) जयपाल देवकाते, २) अविनाश देवकाते. गट क्र.६) बारामती १) नितीन सातव, २) देविदास गावडे. ब वर्ग अजित अनंतराव पवार अनुसुचित जातीजमाती प्रवर्ग- रतन भोसले. महिला राखीव- संगिता कोकरे व ज्योती मुलमुले. इतर मागास प्रवर्ग नितिन शेंडे, भटक्या विमुक्त जाती जमाती- विलास देवकाते. चंद्रराव तावरे व रंजन तावरे या गुरू-शिष्यांच्या सहकार बचाव शेतकरी पॅनेलमध्ये गट क्र. १) माळेगाव १) रंजनकुमार तावरे, २) संग्राम उर्फ गजानन काटे, ३) रमेश गोफणे, गट क्र. पणदरे १) सत्यजीत जगताप, २) रणजित जगताप, ३) रोहन कोकरे. गट नं ३ सांगवी १) चंद्रराव तावरे, २) रणजित खलाटे, ३) संजय खलाटे गट क्र. ४) खांडज शिरवली १) विलास सस्ते, २) मेघशाम पोंद‌कुले, गट क्र. ५) निरावागज, १) राजेस देवकाते, २) केशव देवकाते. गट क्र. ६ बारामती १) गुलाबराव गावडे, २) विरसिंह उर्फ नेताजी गवारे, ब वर्ग भालचंद्र देवकाते. अनुसुचित जाती /जमाती- बापुराव गायकवाड, महिला राखीव प्रतिनिधी राजश्री कोकरे, सौ. सुमन गावडे. इतर मागास प्रवर्ग रामचंद्र नाळे. भटक्या विमुक्त जाती व जमाती विशेष मागास सुर्याजी देवकाते.

जेष्ठ नेते माजी कृषिमंत्री शरद पवार यांच्याकडून बळीराजा सहकार पॅनेल यांच्याकडून गट क्र. १) माळेगांव १) अमित तावरे, २) राजेंद्र काटे, ३) श्रीहरी येळे, गट क्र. २ पणदरे १) सुशिलकुमार जगताप, २) दयानंद कोकरे, ३) भगतसिंग जगताप, गट क्र. ३ संजय तावरे, २) राजेंद्र जाधव, ३) सुरेश खलाटे, गट क्र.४) खांडज-शिरवली, १) सोपान आटोळे, २) तानाजी पोंदकुले, गट कर. ५) निरावागज १) गणपत देवकाते, २) शरद तुपे गट क्र. ६. बारामती १) प्रल्हाद वरे, २) अमोल गवळी, महिला राखीव १) शकुंतला कोकरे, २) पुष्पा गावडे इ.मा.प्र. भारत बनकर, भ.वि. जा.ज. ज्ञानदेव देवकाते, अ.जा.ज.प्र. राजेंद्र भोसले. तर चौथे कष्टकरी शेतकरी पॅनेल उद्या उमेदवार यादी जाहिर करणार आहे.

Advertisement
Tags :

.