कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

चार चिनी घुसखोरांसह 2 नेपाळी महिला अटकेत

07:00 AM May 09, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

बिहारमधील सीमेवर एसएसबीची कारवाई

Advertisement

वृत्तसंस्था/पाटणा

Advertisement

‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारत-नेपाळ सीमेवर हाय अलर्ट जारी आहे. याचदरम्यान, बिहारच्या पूर्व चंपारण जिह्यातील रक्सौल सीमेवर चार चिनी नागरिकांना वैध व्हिसाशिवाय बेकायदेशीरपणे भारतात प्रवेश करण्याचा प्रयत्न करताना अटक करण्यात आली. तसेच दोन नेपाळी महिलांनाही अटक करण्यात आली आहे. सशस्त्र सीमा दलाने (एसएसबी) या घुसखोरांना मैत्री पुलावर ही कारवाई करण्यात आली.

अटक केलेल्या चिनी नागरिकांची ओळख पटली आहे. डॅन विजियान, लिन युंगहुई, हे क्यून हॅन्सन आणि हुवाग लिव्हिंग अशी त्यांची नावे असून ते सर्व चीनच्या हुनान प्रांतातील रहिवासी आहेत. हे चौघेही दोन नेपाळी महिलांसह पायी भारतात प्रवेश करण्याचा प्रयत्न करत होते. सुरुवातीला दोन्ही महिलांना ताब्यात घेण्यात आले. एका महिलेला हिंदी, नेपाळी, इंग्रजी आणि चिनी भाषा अस्खलितपणे बोलता आले. त्यांच्या मोबाईलमध्ये पाकिस्तानी नंबर देखील आढळले. तथापि, चौकशी आणि पडताळणीनंतर दोन्ही महिलांना मार्गदर्शक म्हणून ओळखल्यानंतर सोडून देण्यात आले.

तपासादरम्यान सदर चिनी नागरिक गेल्या एका आठवड्यापासून काठमांडूमध्ये होते. ते वैध कागदपत्रांशिवाय भारतात प्रवेश करण्याचा प्रयत्न करत होते. एसएसबीने त्याच्याकडून 8,000 चिनी युआन, एक पासपोर्ट, पाच मोबाईल फोन आणि एक बॅग जप्त केली. अटकेनंतर एसएसबीने गुप्तचर संस्थांना माहिती देत पुढील तपासासाठी चार चिनी नागरिकांना स्थानिक हरैया पोलिसांच्या स्वाधीन केले. रक्सौलचे डीएसपी धीरेंद्र कुमार यांनी अटकेची पुष्टी करत पुढील तपास सुरू ठेवण्याचे निर्देश दिले आहेत.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article