For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कॉपी प्रकरणी चार केंद्रप्रमुख, एक पर्यवेक्षक निलंबित

03:50 PM Feb 27, 2025 IST | Pooja Marathe
कॉपी प्रकरणी चार केंद्रप्रमुख  एक पर्यवेक्षक निलंबित
Advertisement

नागपूर
दहावी आणि बारावीच्या दोन्ही परिक्षांमधील कॉपीमुक्त अभियानासाठी शिक्षण मंडळासह संपूर्ण प्रशासन कार्यरत आहे. राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावी आणि बारावीच्या परिक्षेत केंद्रावर कॉपीची प्रकरणे आढळल्यास कारवाई करा अशी भूमिका शालेय शिक्षण मंत्र्यांनी दिली होती. याप्रकरणी बोर्डाला वर्धा, चंद्रपूर आणि गडचिरोलीतील केंद्रांवर दहावी आणि बारावी परिक्षांतर्गत कॉपीची प्रकरणे आढळून आली.
याप्रकरणी केंद्रावरील केंद्रप्रमुख आणि पर्यवेक्षक अशा चौघांना विभागीय शिक्षक मंडळाच्या अध्यक्षांनी निलंबित केले आहे. तर इतर दोघांची प्रशासकिय चौकशी सुरू असल्याची माहिती समोर आली. काही दिवसांपूर्वीच विभागीय शिक्षक मंडळाने सहा शिक्षकांच्या निलंबनासाठी शिफारस केली होती.
कॉपीमुक्त अभियान यशस्वी करण्यासाठीच शिक्षण मंडळासह जिल्हा प्रशासन आणि पोलिस विभागा ही कार्यरत होता. यासाठी प्रत्येक स्तरावर भरारी पथके तैनात करण्यात आली आहे. असे असताना, काही केंद्रांवर कॉपीचे प्रकार घडले.
ज्या केंद्रावर कॉपीचे प्रकार घडले आहे, त्या केंद्रावरील ६ शिक्षकांना निलंबित करण्याची शिफारस केल्याची माहिती विभागीय अध्यक्ष चिंतामण वंजारी यांनी दिली. यामध्ये वर्ध्यातील वायगाव, गडचिरोलीतील मुलचरा आणि चंद्रपूर जिल्ह्यातील नवागाव येथील प्रत्येकी एक केंद्रप्रमुख आणि खोलीतील पर्यवेक्षकांचा समावेश होता.
त्यापैकी सध्या गडचिरोली आणि चंद्रपूर येथील दोन पर्यवेक्षक आणि दोन केंद्रप्रमुख यांना निलंबित करण्यात आले आहे. तर वर्धा जिल्ह्यातील पर्यवेक्षक आणि दोन केंद्र प्रमुखाची प्रशासकिय चौकशी सुरु आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.