For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

‘सोळा लाख’प्रकरणी चौघांना अटक

11:41 AM Apr 05, 2024 IST | Tarun Bharat Portal
‘सोळा लाख’प्रकरणी चौघांना अटक
Advertisement

गुरुवारी सशर्त जामिनावर सुटका : वास्कोतील दोघे पोलीस निलंबित

Advertisement

वास्को : आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी दक्षिण गोवा जिल्हाधिकाऱ्यांनी निलंबित केलेल्या चारही  जणांना बुधवारी रात्री उशिरा अटक करण्यात आली. गुऊवारी या प्रकरणात हलगर्जीपणा केल्याप्रकरणी दक्षिण गोवा पोलीस अधीक्षक सुनिता सावंत यांनी हवालदार विनायक कळंगुटकर व शिपाई आनंद नाईक या दोघांना सेवेतून निलंबित केले आहे. दरम्यान, बुधवारी रात्री अटक केलेल्या चारही जणांना गुरुवारी न्यायालयाने जामिनावर मुक्त केलेले आहे. त्या सोळा लाखांपैकी आठ लाख रुपये भरारी पथकातील दोघांकडून जप्त करण्यात आले आहेत. दरम्यान याच प्रकरणाशी संबंधित आणि वास्को पोलीस स्थानकाच्या सेवेत असलेल्या विनायक कळंगुटकर व आनंद नाईक या पोलिसांना काल गुरुवारी सेवेतून निलंबित करण्यात आले आहे. हे दोघेही पोलीस भरारी पथकाचेच सदस्य होते. मात्र, त्यांनी घडलेल्या संशयास्पद प्रकरणाकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप आहे.

दाबोळीत घडला गैरव्यवहार

Advertisement

31 मार्चच्या रात्री दाबोळीत हा आर्थिक गैरव्यवहार घडला होता. निवडणूक आचारसंहिता अंतर्गत प्रत्येक मतदारसंघात तैनात करण्यात आलेल्या भरारी पथकानेच  तब्बल सोळा लाखांवर डल्ला मारल्याचा संशय आहे. वरिष्ठांकडून माहिती मिळाल्याने दाबोळीचे भरारी पथक कारवाई करण्यासाठी मोक्याच्या ठिकाणी थांबले होते. पवनकुमार वर्मा व अशोक चौधरी या दोघा व्यक्तींना भरारी पथकाचा प्रमुख तथा मुरगाव पालिकेतील अभियंता अनिऊद्ध पवार आणि वास्को वीज विभागातील लिपिक नितीश नाईक वास्को पोलीस स्थानकात घेऊन आले. मात्र, त्यांच्याकडून पैसे मिळालेच नसल्याचा दावा या भरारी पथकाने केला. मात्र, पोलीस स्थानकाबाहेरील सीसीटिव्ही फुटेजमध्ये संशयास्पद प्रकार आढळून आलेला असून याबाबत चौकशी सुरू आहे.

रात्री उशिरा चौघांना अटक

अनिरुद्ध पवार व नितीश नाईक या दोघा कर्मचाऱ्यांना बुधवारी संध्याकाळी दक्षिण गोवा जिल्हाधिकारी अश्विन चंद्रू यांनी निलंबित केले होते. त्यानंतर रात्री भरारी पथकाशी संबंधित टॅक्सीचालक केशव खांडवेकर व एक नागरिक चंदन नाईक या कर्मचाऱ्यांनाही सेवेतून निलंबित करण्यात आले. त्यानंतर रात्री उशिरा या चौघानांही वास्को व वेर्णा पोलिसांनी अटक केली होती. वास्को येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी शाहीर इस्सानी यांच्या न्यायालयापुढे या प्रकरणासंबंधी अटक करण्यात आलेल्या आरोपींच्या अर्जावर गुरुवारी सुनावणी झाली. संशयित आरोपी नितेश नाईक, अनिरुद्ध पवार, चंदन यादव व केशव खवणेकर यांनी आपल्याला जामिनावर सोडण्यात यावे म्हणून वास्को न्यायालयाकडे अर्ज केले होते. अनिरुद्ध पवार याच्याविरुद्ध वास्को पोलिसांनी दोन गुन्हे नोंद केले आहेत. या संशयिताच्यावतीने अॅड. अमय प्रभुदेसाई यांनी तर संशयित आरोपी नितेश नाईक याच्यावतीने अॅड. सागर कळंगुटकर यांनी काम पाहिले. चंदन यादव याच्यावतीने अॅड. प्रसाद देसाई यानी तर संशयित आरोपी केशव खवणेकर याच्यावतीने अॅड. अखिल नाईक यांनी काम पाहिले. अनेक अटी घालून या प्रकरणातील संशयित आरोपींना जामिनावर सोडण्याचा आदेश न्या. शाहीर इस्सानी यांच्या न्यायालयाने गुरुवारी दिला. मात्र, न्यायालयाने कोणत्या अटी घातलेल्या आहेत त्या कळू शकल्या नाहीत.

Advertisement
Tags :

.