जिल्हा पोलीसप्रमुख ऋषिकेश सोनवणे यांची माहिती : विजापूर पोलिसांच्या तपासाला यश
वार्ताहर /विजापूर
दोन दिवसांपूर्वी शहरात झालेल्या रोहित पवार या तरुणाच्या खून प्रकरणाचा तपास लावण्यात पोलिसांना यश आले आहे. एका अल्पवयीन मुलासह चौघांना अटक करण्यात आली आहे. मुझमिल हशीम खाद्री इनामदार (22, रा. राजाजीनगर), साईनाथ परशुराम पवार (20, रा. गच्छीनकट्टी कॉलनी), शरणू शिवानंद कुरी, अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. या कारवाईविषयी अधिक माहिती देताना पत्रकार परिषदेत जिल्हा पोलीस प्रमुख ऋषिकेश सोनवणे म्हणाले, शहरात घडलेल्या या हत्या प्रकरणाच्या तपासासाठी सीपीआय मल्लय्या मठपती यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथक तयार करण्यात आले होते. त्या पथकाच्यावतीने आरोपींना पकडण्यात यश आले आहे. काही दिवसांपूर्वी बंबाळ आगशी, इंडी रोड येथील रोहित सुभाष पवार याला अटक करण्यात आली होती.
तरुणाच्या खूनप्रकरणी गणेश पवार याने तक्रार दाखल केली होती. त्या आधारे प्रकरणाच्या तपासासाठी विशेष पथक तयार करण्यात आले होते. सदर पथक तपासावर असताना त्यांनी त्याला सिंदगी तालुक्यातील मोरटगी बसस्थानक आवारात संशयास्पद वारणाऱ्या चौघांना ताब्यात घेतले होते. त्यांची कसून चौकशी केली असता आरोपीने रोहितची हत्या मुझमिल इनामदाराने केल्याचे सांगताना ते म्हणाले की, आरोपी मुझमिल इनामदार याला 2 लाख आणि साईनाथ पवार याला 88 हजार रुपये, वसंत चव्हाण याने दरमहा 10 रु. व्याजदर म्हणून दिले होते. मात्र, या आरोपींनी वसंतला मुद्दल व व्याजाची रक्कम परत केली नाही. यामुळे वसंतने रोहिताला मुद्दल पैसे आणि व्याज वसूल करण्यास सांगितले. वसंताच्या सांगण्यावरून खून झालेल्या रोहितने दोन आरोपींना पैसे आणि व्याज देण्यासाठी तगादा लावला होता. तसेच तो मारहाण, चाकू दाखवून धमकावत होता. यामुळे चिडलेल्या सर्व आरोपींनी रोहितच्या हत्येचा कट रचला होता. तपासादरम्यान रोहितच्या डोळ्यात मिरची पावडर टाकत त्याच्यावर चाकूने वार केले. त्यानंतर त्याच्या डोक्यात दगड घालून हत्या केली. यानंतर त्याचा मृतदेह काटेरी झुडपात फेकून ते फरार झाले, असे तपासात निष्पन्न झाले असल्याचे जिल्हा पोलीसप्रमुख ऋषिकेश सोनावणे यांनी सांगितले.