बेकायदा रेशन धान्य वाहतूक, चौघांना अटक
10:59 AM Jun 04, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
वार्ताहर/विजापूर
Advertisement
जिह्यातील इंडी तालुक्यातील सालोटगी रस्त्यावर पोलिसांनी गोपनीय माहितीनुसार छापा टाकून बेकायदेशीररित्या साठा करून ठेवलेले धान्य वाहतूक प्रकरणी चौघांना अटक करून धान्य जप्त केले. मुजामील मकानदार, शिराज तांबोळी, गालिब मिट्टे आणि गणू देवकत्ते अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. त्यांच्याकडून 27,260 रुपयांचे 9 क्विंटल 40 किलोचे शिधा धान्य जप्त करण्यात आले आहे. हे धान्य अंदाजे एक लाख रुपये किमतीच्या वाहनातून नेण्यात येत होते. पोलिसांनी धान्य आणि वाहन जप्त केले आहे. या प्रकरणी इंडी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
Advertisement
Advertisement