Solapur : उमरगा नगरपालिकेत नगरसेवक पदासाठी चार तर नगराध्यक्ष पदासाठी एक अर्ज दाखल
उमरगा नगरपालिकेत १२ प्रभागांमध्ये २५ सदस्य जागांसाठी निवडणूक प्रक्रिया
उमरगा : उमरगा नगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या चौथ्या दिवशी सदस्यपदाकरिता ४ तर नगराध्यक्ष पदासाठी एक उमेदवारी अर्ज दाखल झाला आहे.
यावेळी नगरपालिकेचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार गोविंद येरमे व सहाय्यक निवडणूक अधिकारी तथा मुख्याधिकारी लक्ष्मण कुंभार यांनी उमेदवारी अर्ज स्वीकारला. सदस्यपदाकरिता बालाजी गणपती मस्के (प्रभाग क्रमांक ११ - काँग्रेस), बालाजी गणपती मस्के (प्रभाग क्रमांक 11- शिवसेना), अनिता तिप्पा बनसोडे (प्रभाग क्रमांक ११ अपक्ष) तर सचिन दिलीप जाधव (प्रभाग क्रमांक दोन- शिवसेना) यांचा समावेश आहे.
यावेळी सचिन जाधव यांचा फॉर्म भरताना माजी खासदार रवींद्र गायकवाड यांची उपस्थिती होती. तसेच जनतेतून थेट निवडून द्यावयाचे नगराध्यक्षपदाकरिता भाजपच्या वतीने हर्षवर्धन चालुक्य यांनी उमेदवारी अर्ज दाखल. शहरातील १२ प्रभागांमधील २५ जागा आणि जनतेतून थेट निवडून द्यावयाचे नगराध्यक्षपदाकरिता निवडणूक होत आहे. उमरगा नगरपालिका कार्यालयात १७ नोव्हेंबरला दुपारी तीन वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज प्रत्यक्षात स्वीकारले जाणार आहेत.